Join us  

वानखेडेवर चक्क बारामतीची भेळ? रोहित पवारांचा चेहराच खुलला

रोहित पवारांचा क्रिकेट हा आवडता खेळ आहे. मात्र त्यांना कामाच्या व्यापामुळे मनसोक्त खेळता येत नाही. यामुळे कधी वेळ मिळेल तेव्हा बॅट हातात घेतोच, असे म्हणत त्यांनी वानखेडे स्टेडिअमवर आलेला अनुभव सांगितला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 4:19 PM

Open in App
ठळक मुद्देही मॅच पाहण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार रोहित पवार त्यांचे आजोबा म्हणजेच शरद पवार यांच्यासोबत गेले होते. वानखेडे स्टेडिअमवर काल भारताची ऑस्ट्रेलियाबरोबर पहिली वनडे मॅच झाली.

मुंबई : वानखेडे स्टेडिअमवर काल भारताची ऑस्ट्रेलियाबरोबर पहिली वनडे मॅच झाली. यामध्ये फलंदाजांनी हाराकिरी केल्य़ाने भारताला दारूण पराभव स्वीकारावा लागला. ही मॅच पाहण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार रोहित पवार त्यांचे आजोबा म्हणजेच शरद पवार यांच्यासोबत गेले होते. यावेळी त्यांना स्टेडिअममध्ये बारामतीची भेळ दिसली आणि हायसे वाटले. 

रोहित पवारांचा क्रिकेट हा आवडता खेळ आहे. मात्र त्यांना कामाच्या व्यापामुळे मनसोक्त खेळता येत नाही. यामुळे कधी वेळ मिळेल तेव्हा बॅट हातात घेतोच, असे म्हणत त्यांनी वानखेडे स्टेडिअमवर आलेला अनुभव सांगितला. रोहित पवार कामानिमित्त मुंबईत आले होते. यावेळी शरद पवार हे वानखेडे स्टेडिअमवर मॅच पाहण्यासाठी गेले होते. म्हणून रोहित पवारांनीही वानखेडे गाठले आणि मॅचचा आनंद लुटला. त्यांना ही मॅच पूर्ण संपेपर्यंत पाहता आली नाही. मात्र, 'बीसीसीआय'चे अध्यक्ष सौरभ गांगुली, मोहम्मद अझरुद्दीन आणि दिलीप वेंगसरकर यांची भेट घेता आली. 

 

यावेळी मुंबई आणि पनवेलहून काही कार्यकर्तेही मॅच पाहण्यासाठी आले होते. त्य़ांनी रोहित पवारांना प्रेक्षक गॅलरीत येण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत रोहित पवार प्रेक्षक गॅलरीत गेलेही. याचवेळी तेथे भेळ विकणारा एक विक्रेता फिरत होता. त्याने म्हटलेले 'बारामतीची भेळ' हे शब्द कानावर पडताच रोहित पवारांचे लक्ष लगेचच आवाजाच्या दिशेने वळले. वानखेडे सारख्य़ा आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर बारामतीची भेळ? या विचाराने त्यांना आधी आश्चर्यच वाटले. पण नंतर त्यांची छाती अभिमानाने फुलून गेली. रोहित यांनी या भेळ विक्रेत्यांसोबत चर्चा केली आणि ही भेळ क्रिकेटप्रेमींच्या पसंतीस उतरत असल्याचे पाहून समाधानही व्यक्त केले. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला ३-० असा लाजीरवाणा पराभव पत्करावा लागणार, माजी क्रिकेटपटूचा बाऊन्सर

 पहिल्या सामन्यातील 'त्या' निर्णयाचा विराट कोहली पुनर्विचार करणार

असं भारतातच घडू शकतं; ...म्हणून पहिल्या सामन्यात व्यत्यय!

टॅग्स :रोहित पवारभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाशरद पवारसौरभ गांगुलीराष्ट्रवादी काँग्रेस