Join us

Asia Cup 2022 : India vs Afghanistan लढत पाहण्यासाठी येऊ नकोस, नाहीतर...!, अफगाणिस्तानच्या सुंदरीची चर्चा अन्...  

Asia Cup 2022 : India vs Afghanistan - अफगाणिस्तान संघाने आशिया चषक २०२२मध्ये सलग दोन विजय मिळवून Super 4 मध्ये प्रवेश केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 17:25 IST

Open in App

Asia Cup 2022 : India vs Afghanistan - अफगाणिस्तान संघाने आशिया चषक २०२२मध्ये सलग दोन विजय मिळवून Super 4 मध्ये प्रवेश केला. श्रीलंका व बांगलादेश यांच्यावर अफगाणिस्तानने निर्विवाद वर्चस्व गाजवले. आता सुपर ४ मध्ये अफगाणिस्तानचा संघ आशियातील दोन अव्वल संघ भारत व पाकिस्तान यांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. भारत व पाकिस्तान अ गटात हाँगकाँगवर सहज विजय मिळवून सुपर ४ मध्ये पात्र ठरतील अशी खात्री आहे. भारत-अफगाणिस्तान यांच्यातल्या लढतीआधीच एका तरुणीची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी तिला भारत-अफगाणिस्तान सामना पाहण्यासाठी येऊ नको, असे थेट सांगूनही टाकले आहे.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत केवळ १२७ धावा केल्या. नजीब उर रहमान आणि राशिद खान यांच्या फिरकीच्या जाळ्यात बांगलादेश फलंदाज चांगलेच अडकले. त्यानंतर अफगाणिस्तानच्या फलंदाजांनाही काही काळ संघर्ष करावा लागला, पण अखेरच्या टप्प्यात नजीबुल्लाह आणि इब्राहिम झादरान या जोडीने संघाला विजय मिळवून दिला.  १२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हजरतुल्ला झझाईने २३ धावांची खेळी केली. रहमानुल्ला गुरबाजही ११ धावांत माघारी परतला. कर्णधार मोहम्मद नबीलाही ८ धावांवर तंबूत परतावे लागले. पण त्यानंतर इब्राहिम झादरानने ४१ चेंडूत नाबाद ४२ तर नजीबुल्लाह झादरानने १७ चेंडूत धडाकेबाज नाबाद ४३ धावा कुटल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.

हा लढत पाहण्यासाठी Wazhma Ayoubi ही तरुणी स्टेडियमवर उपस्थित होती. तिने अफगाणिस्तानचा झेंडा हाती घेऊन फोटो पोस्ट केला आणि त्यानंतर सोशल मीडियावर तिचीच चर्चा रंगली.

कोण आहे Wazhma Ayoubi ?वाजमा अयुबी अफगाणिस्तानमधील एक व्यावसायिक महिला आणि सामाजिक कार्यकर्त्या आहे.  

टॅग्स :एशिया कप 2022ऑफ द फिल्डअफगाणिस्तान
Open in App