Join us

Rashid Khan : बाबो... काय म्हणायचं या शॉटला?; सोशल मीडियावर राशिद खानचीच चर्चा, Video

अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान ( Rashid Khan) याचीच शनिवारी सोशल मीडियावर चर्चा रंगली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 21:30 IST

Open in App

अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान ( Rashid Khan) याचीच शनिवारी सोशल मीडियावर चर्चा रंगली. ट्वेंटी-२० ब्लास्ट २०२१मध्ये ससेक्स क्लबकडून खेळणाऱ्या राशिदनं पहिल्याच सामन्यात धमाकेदार शॉट मारला. या सामन्यात राशिदची कामगिरी एवढी साजेशी झाली नाही, परंतु त्याच्या अतरंगी फटक्याची चर्चा जोरदार रंगली. त्यानं १३ सामन्यात २६ धावांची वादळी खेळी केली आणि त्यात ४ चौकार व १ षटकाराचा समावेश होता. राशिदनं त्या अतरंगी शॉटचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला.  राशिद खानचा हा व्हिडीओ ट्वेंटी-२० ब्लास्टनेही सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यांनी राशिदला विचारले की हा चेंडू तू कसा सीमापार पाठवलास?. राशिदचा हा फटका भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या हॅलिकॉप्टर शॉट्सशी मिळताजुळता आहे. त्याच्या या व्हिडीओवर एकानं कमेंट केली की, महेंद्रसिंग धोनीनं हॅलिकॉप्टर शॉट पृथ्वीवर आणला, परंतु राशिदनं त्याला मंगळ ग्रहावर पोहोचवलं.   

 

टॅग्स :टी-20 क्रिकेटअफगाणिस्तानमहेंद्रसिंग धोनी