इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित सामन्यांसाठी गतविजेता मुंबई इंडियन्सचा संघ ( Mumbai Indians) शुक्रवारी दुबईत दाखल झाला. १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्सचा सामना महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे. भारतातील कोरोना परिस्थितीमुळे आयपीएलचे उर्वरित ३१ सामने दुबईत खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयला घ्यावा लागला. मुंबई इंडियन्सचा ताफा शुक्रवारी अबु धाबीसाठी मुंबई विमानतळावरून हवेत झेपावले. यावेळी विमान चालकानं मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना आश्चर्याचा धक्का दिला.
विमानचालकानं क्रिएटिव्ह घोषणा करून मुंबई इंडियन्सच्या ताफ्याचं मन जिंकले ( The members onboard the flight were in for a surprise as the pilot decided to make a creative announcement). त्यासाठी त्यानं मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंच्या नावाचा वापर केला. ''तुमचे विमानात स्वागत करताना मला आनंद होत आहे. आज सकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता आपण जलद सुरुवात केली आहे, तशीच जशी रोहित शर्मा व क्विंटन डी कॉक संघाला करून देतात.'' पायलटनं यावेळी किरॉन पोलार्ड, इशान किशन, जसप्रीत बुमराह आणि सुर्यकुमार यादव यांच्या नावाचा वापर केला.
मुंबई इंडियन्सचा ताफा पोहोचला दुबईत; मालक अंबानी यांनी खेळाडूंसाठी बूक केलंय आलिशान हॉटेल, See Photo
Mumbai Inidian Matches Schedule :
19 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
23 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
26 सप्टेंबर - पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
28 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
2 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून
5 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
8 ऑक्टोबर - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून