Join us

Video: Run Out वरून मैदानावर फलंदाजांमध्ये जुंपली, कोण बाद यावरून झाला वाद

दोन फलंदाजांमध्ये समन्वयाचा अभाव झाल्यानं Run Out होण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 10:55 IST

Open in App

दोन फलंदाजांमध्ये समन्वयाचा अभाव झाल्यानं Run Out होण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. पण, अशी घटना घडल्यानंतर फलंदाजांमध्ये बाद कोण यावरून वाद होण्याचा प्रसंग कदाचित पहिल्यांदाच घडला असावा. समन्वयाच्या अभावामुळे दोन्ही फलंदाज क्रिजच्या एकाच टोकावर उभे राहिले आणि प्रतिस्पर्धी संघाने दुसऱ्या टोकाच्या यष्टी उडवून Run Out केले. त्यानंतर दोन्ही फलंदाजांमध्ये तंबूत कोणी जावे, यावरून मैदानावर वाद रंगला. वन डे क्रिकेट वर्ल्ड कप चॅलेंज लीग ग्रुप अ गटातील कॅनडा विरुद्ध डेन्मार्क यांच्या सामन्यातील हा प्रसंग.  कॅनडाचा फलंदाज हमजा तारिकने चेंडू टोलावून एक धाव घेतली आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो सहकारी रवींद्रपाल सिंह याच्या क्रिजवर जावून पोहोचला. तेव्हा डेन्मार्कचा यष्टिरक्षक अब्दुल हाशमीने जोनास हेनरिक्सनच्या थ्रो मागितला आणि क्रिजच्या दुसऱ्या टोकावर धावत जात यष्टी उडवल्या.

त्यानंतर कॅनडाच्या दोन्ही फलंदाजांमध्ये बाद सुरू झाला. अखेरिस हमजाला मैदान सोडावे लागले. आयसीसीनं या व्हिडीओवरून दोन्ही फलंदाजांना ट्रोल केले.   

टॅग्स :आयसीसीकॅनडा