Join us  

वर्ल्डकप फायनलमध्ये भारत पराभूत, एका भारतीय क्रिकेटपटूनं प्रतिस्पर्धी टीमशी केलेली हातमिळवणी!

India vs Bangladesh, Wasim Jaffer : बांगलादेशच्या विजयात एका भारतीय क्रिकेटपटूचा हात होता. कसं? हे आपण जाणून घेऊयात...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 12:16 PM

Open in App

भारत आणि बांगलादेशमध्ये (India vs Bangladesh) गेल्या वर्षी याच दिवशी अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकप फायनल (Under19 World Cup Final) सामना खेळविण्यात आला होता. भारतीय संघाला या सामन्यात तीन विकेटने पराभवाचा सामना करावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेत खेळविण्यात आलेल्या अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशच्या संघानं एकही सामना गमावला नव्हता. बांगलादेश क्रिकेटसाठी आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. अंतिम फेरीत बांगलादेशच्या संघानं भारतीय संघाला १७७ धावांमध्ये गारद केलं होतं. प्रत्युत्तरात पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशने या सामन्यात तीन विकेट्सने विजय प्राप्त केला. पण यापेक्षाही आश्चर्याचीबाब अशी की बांगलादेशच्या या विजयात एका भारतीय क्रिकेटपटूचा हात होता. कसं? हे आपण जाणून घेऊयात...

भारतीय क्रिकेटपटूला बांगलादेशने नेमलं प्रशिक्षकबांगलादेश क्रिकेट बोर्डाने (Bangladesh Cricket Board) भारताचा फर्स्टक्लास क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jaffer) याला २०१९ साली बांगलादेशच्या हाय परफॉर्मिंग अकॅडमीच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्त केलं होतं. वसीम जाफरने आपल्या कार्यकाळात बांगलादेशच्या अंडर-१९ क्रिकेट संघाचा कर्णधार अकबर अली (Akbar Ali) आणि शहादक हुसैन यांच्यासह अनेक युवा खेळाडूंना प्रशिक्षण दिलं. जाफरने बांगलादेशच्या संघानं वर्ल्डकप जिंकल्यानंतर शुभेच्छा देखील दिल्या. "अकबर अली भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यात चांगलाच आक्रमकपणे खेळताना पाहायला मिळाला. अंतिम सामन्यात त्यानं संघाला चांगली सुरुवात करुन दिली. अकबरने बांगलादेशच्या अंडर-१४ आणि अंडर-१६ संघाचंही नेतृत्व केलं आहे", असं वसीम जाफर बांगलादेशच्या विजयानंतर म्हणाला होता. 

प्रथम श्रेणी क्रिकेटचा 'बादशहा' आहे वसीम जाफरवसीम जाफरने ३१ कसोटी सामन्यांमध्ये भारतासाठी १९४४ धावा केल्या आहेत. यात ५ खणखणीत शतकं आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. वसीमने ३४.१० च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. याशिवाय, वसीमने भारतासाठी दोन एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत. यात त्यानं १० धावा केल्या आहेत. वसीमच्या नावावर द्वीशतकी खेळीचाही समावेश आहे. वसीम जाफरला प्रथम श्रेणी क्रिकेटचा बादशहा म्हणून ओळखलं जातं. वसीमने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तब्बल २६० सामने खेळले असून यात ५७ खणखणीत शतकं ठोकली आहेत. यात तब्बल १९,४१० धावा वसीमनं केल्या आहेत. इतकंच नव्हे, तर रणजी करंडकाच्या इतिहासात वसीमचं नाव सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशभारतीय क्रिकेट संघभारतबांगलादेश