Join us

Ind vs Ban: अम्पायरचा 'तो' निर्णय विराटच्या शतकासाठीच होता का? जाणून घ्या खरं कारण

विराट कोहली शतकाच्या उंबरठ्यावर असताना ४१ व्या षटकात हसन महमूदने वाईड चेंडू टाकल्याने विराटचे गणित बिघडले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 08:57 IST

Open in App

बांगलादेशने विजयासाठी ठेवलेल्या २५७ धावांचा पाठलाग करताना विराट व लोकेश राहुल यांनी भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. भारताला विजयासाठी २६ धावांची गरज होती आणि विराटला शतकासाठी तेवढ्याच धावा हव्या होत्या. त्यावेळी, विराट शतकासह भारताचा विजयाचा ताळमेळ घालण्यात या जोडीला यश आलं. मात्र, दरम्यान, अम्पायर रिचार्ड केटलब्रो यांनी एका चेंडूवर वाईड बॉल न दिल्यामुळेच विराटचं शतक पूर्ण झाल्याचं चाहत्यांना वाटत आहे. सध्या अम्पायरचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पण, अम्पायर रिचार्ड यांच्या निर्णयामागे नवीन नियमावलीचा आधार असल्याचंही समोर येत आहे. 

विराट कोहली शतकाच्या उंबरठ्यावर असताना ४१ व्या षटकात हसन महमूदने वाईड चेंडू टाकल्याने विराटचे गणित बिघडले. त्यानंतर त्याने २,०,२,०,१ अशा घावा काढल्या. ४२ व्या षटकात नसूमने वाईड फेकला होता, परंतु अम्पायरने तो दिला नाही. विराटला शतकासाठी ३ आणि भारताला विजयासाठी २ धावा हव्या होत्या. विराटने खणखणीत षटकार खेचून भारताच्या विजयासोबत शतकही पूर्ण केले. भारताने ४१.३ षटकांत ३ बाद २६१ धावा करून विजय पक्का केला. विराटने ९७ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १०३ धावा केल्या. लोकेश राहुल ३४ धावांवर नाबाद राहिला.

विराटचे शतक होण्यास पंचाचा तो निर्णयच कारणीभूत असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. अम्पायरने विराटच्या शतकासाठीच तो चेंडू वाईड दिला असल्याचेही नेटीझन्सचे म्हणणे आहे. मात्र, यामागे एमसीसीच्या नवीन नियमावलीचाही दाखला समोर आला आहे. काही समिक्षकांकडून पंचाच्या निर्णयाचं समर्थन केलं जात आहे. 

एमसीसीच्या नियमांतील बदल

एमसीसीचा नियम खंड २२.१.१ जो वाईड चेंडूसाठी आहे. जर एखादा गोलंदाज चेंडू फेकतो, जो नो बॉल नाही. त्यास अम्पायर वाईड देऊ शकतो. तसेच, २२.१.२ च्या नियमावलीनुसार, चेंडू हा स्ट्रायकर उभारल्याचा जागेपासून दूरुन जाते आणि गार्ड स्थितीत उभा असलेल्या स्ट्रायकरपासूनही दूर जाते.

एमसीसीने मार्च २०२२ रोजी क्रिकेटसंबंधित नवीन आचार संहितेची घोषणा केली आहे. जी १ ऑक्टोबरपासून लागू करण्यात येत आहे. त्यामध्ये, २२.१ हा नियम वाईड चेंडूसंदर्भात आहे.    

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ