Join us

"आरे ये स्टेजवर ये लाजू नको!" हिटमॅन रोहितनं टीम इंडियातील 'नंबर वन डान्सर'ला दिलं चॅलेंज, पण..

मुंबई इंडियन्सच्या संघानं शेअर केला वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रमातील खास व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 11:20 IST

Open in App

मुंबईतील वानखेडे स्टेडियमला ५० वर्षे पूर्ण झाली. स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी प्रवासाच्या निमित्ताने वानखेडे स्टेडियमवर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मुंबई ही देशातील क्रिकेटची पंढरी समजली जाते. या कार्यक्रमात मुंबईकर क्रिकेटर्सशिवाय प्रेक्षकांनी मोठ्या संख्येनं कार्यक्रमाला उपस्थितीत लावली होती. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

लिटल मास्टर ते मास्टर ब्लास्टर दिग्गजांनी लावली होती हजेरी

अनेक क्रिकेटर्संनी खास किस्से शेअर करत जुन्या आठणींना उजाळा दिला. या कार्यक्रमात लिटल मास्टर सुनील गावसकर, रवी शास्त्री, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून ते अगदी भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात रोहित शर्मानं आपल्या हटके अंदाजानं लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले.

म्युझिक मोड अन् डान्सचा मूड

रोहित शर्माचा स्टेजवरील एक खास व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात म्युझिक मोड अन् त्याने डान्ससाठी टीम इंडियातील स्टार खेळाडूकडे दाखवलेले बोट हा सीन एकदम खास होता. टीम इंडियातील नंबर वन डान्सर कोण? याची हिंटच जणून रोहित शर्मानं या कार्यक्रमात दिली. गाणं सुरु झाल्यावर रोहित शर्मा टीम इंडियातील आपला सहकारी आणि मुंबईकर श्रेयस अय्यरला हातवारे करून डान्ससाठी स्टेजवर बोलावताना दिसले. 

तो लाजून हसला अन्...

रोहित शर्माच्या इशाऱ्यांनुसार, कॅमेरा श्रेयस अय्यरकडे फिरला. यावेळी त्याची रिअ‍ॅक्शन बघण्याजोगी होती. श्रेयस अय्यर अगदी लाजून हसताना पाहायला मिळाले. कॅप्टन बोलवत राहिला पण तो काही स्टेजवर गेला नाही. श्रेयस अय्यर हा भारतीय संघातील मध्यफळतील एक सर्वोत्तम बॅटर आहे. बॅटिंग स्कीलप्रमाणेच त्याच्यात डान्सिंग स्किलही आहे. अनेकदा सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याचेही पाहायला मिळाले आहेत. रोहितनं तर त्याला डान्ससाठी बोलवून तोच टीम इंडियातील नंबर वन डान्सर असल्याची हिंट दिल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही तर स्टेजवर ये आणि बिनधास्त डान्स कर, अस चॅलेंज रोहितनं त्याला दिलं. पण अय्यरचं काही स्टेजवर यायचं धाडस दाखवलं नाही.

 

टॅग्स :रोहित शर्माश्रेयस अय्यरभारतीय क्रिकेट संघऑफ द फिल्ड