Vijaykumar Vyshak Failed To Clear Fitness Test : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि शुबमन गिल यासारख्या लोकप्रिय चेहऱ्यांसह देशांतर्गत क्रिकेटच्या मैदानात उतरणाऱ्या अनेक खेळाडूंना बंगळुरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सेलन्स (CoE) येथे अनिवार्य फिटनेस टेस्टला सामोरे जावे लागले. एका बाजूला प्रसिद्ध कृष्णा याने सर्वोच्च अंक मिळवत फिटनेस टेस्टमध्ये अव्वल स्थान पटकावले. दुसरीकडे एका भारतीय गोलंदाजावर फिटनेस टेस्टमध्ये फेल झाल्यामुळे संघातील स्थान गमावण्याची वेळ आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
फिटनेस टेस्टमध्ये अपात्र ठरताच गोलंदाजाचा दाखवण्यात आला संघाबाहेरचा रस्ता
कर्नाटकचा वेगवान गोलंदाज विजयकुमार वैशाक याची देशांतर्गत प्रतिष्ठित स्पर्धा असलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील दक्षिण विभाग संघात निवड झाली होती. पण फिटनेस टेस्टमध्ये अपात्र ठरल्यामुळे त्याचा या संघातील पत्ता कट झाला आहे. तिलक वर्माच्या जागी केरळचा अझरुद्दीन नेतृत्व करत असलेला दक्षिण विभाग संघ ४ सप्टेंबरपासून दुलीप करंडक स्पर्धेत उत्तर भारत संघाविरुद्ध सामना खेळणार आहे. या सामन्याआधी संघात बदल करण्यात आला असून विजयकुमार वैशाकच्या जागी वासुकी कौशिक याची दक्षिण विभागाच्या संघात वर्णी लागली आहे.
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
दुखापतीतून सावरु मैदानात उतरला, पण...
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, वैशाक हंगामाच्या सुरुवातीपूर्वी आणि आशिया कपच्या पार्श्वभूमीवर सर्व क्रिकेटपटूंसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या फिटनेस चाचणीत फेल ठरलाय. आयपीएल २०२५ मध्ये तो पंजाब किंग्ज (PBKS) च्या ताफ्यातून खेळताना दिसला होता. मांडीच्या स्नायूला झालेल्या (Quad injury) दुखापतीतून सावरुन तो ५ सामने खेळला ज्यात त्याला फक्त ४ विकेट्स मिळवता आल्या. आता अनफिट ठरल्यामुळे त्याला काही काळ क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे.
वैशाकची आतापर्यंतची कामगिरी
बीसीसीआयच्या फिटनेस मूल्यांकनात भारतीय क्रिकेटर्संना आधीपासून घेण्यात येणाऱ्या यो यो टेस्ट शिवाय ब्रॉन्को टेस्टला सामोरे जावे लागत आहे. वैशाक कुठं कमी पडला ते अजून गुलदस्त्यातच आहे. त्यासंदर्भातील सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. कर्नाटकच्या प्रमुख वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत २६ सामन्यांत १०३ बळी घेतले आहेत, त्याचा गोलंदाजी सरासरी २३.८८ आहे.
असा आहे दक्षिण विभाग संघ
मोहम्मद अझरुद्दीन (कर्णधार व यष्टिरक्षक), तन्मय अग्रवाल, देवदत्त पडिक्कल, मोहित काळे, सलमान निझार,एन. जगदीशन (उपकर्णधार व यष्टिरक्षक), टी. विजय, आर. साई किशोर, तनय त्यागराजन, वासुकी कौशिक, एम. डी. निधीश, रिकी भुई, बेसिल एन. पी, गुरजपनीत सिंह, स्नेहल काऊठंकर,अंकित कुमार, शेख रशीद.