कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. क्रीडा स्पर्धाही रद्द झाल्यामुळे खेळाडू आपापल्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ देत आहेत. आपल्या मुलांसोबत क्रिकेटपटू रमले आहेत आणि त्यांच्यासोबत खेळण्या ते व्यग्र आहेत. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्डिड वॉर्नरही आपल्या मुलींसोबत धम्माल मस्ती करत आहे. मुलीसोबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत वॉर्नर त्याच्या मुलीसह बॉलिवूड चित्रपटातील 'शीला की जवानी' या गाण्यावर थिरकताना दिसला आहे.
MS Dhoniचा तीन वर्षांचा Future Plan ठरलाय!
वॉर्नरने त्याच्या मुलीसोबत टिक टॉक व्हिडीओ केला आहे. त्यात वॉर्नरनं म्हटलं की, ''पाच वर्षांच्या मुलीच्या सांगण्यावरून मी टिक टॉक वर आलो. पण, माझा एकही फॉलोअर नाही. कृपया मला मदत करा.''
पाहा व्हिडीओ...
कोरोना व्हायरसचे जगभरात आतापर्यंत 22लाख 51, 446 रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 1 लाख 54,278 जणांचा मृत्यू झाला असून 5 लाख 71,359 जणं बरी झाली आहेत. ऑस्ट्रेलियातील रुग्णांची संख्या 6560 झाली असून 69 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.