टीम इंडियाचा एकेकाळचा विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या कौटुंबिक आयुष्यात वादळ आल्याच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू आहेत. वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती सेहवाग यांच्यात मतभेद झाले असून, दोघेही वेगळे राहत असल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, आता याबाबत सोशल मीडियावरून एक धक्कादायक दावा केला जात आहे. वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती ही माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष मिथुन मन्हास यांना डेट करत असल्याची अफवा पसरली आहे. तसेच या दोघांचाही एक फोटो व्हायरल होत आहे.
हल्लीच बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले मिथुन मन्हास आणि वीरेंद्र सेहवाग हे दिल्लीच्या संघातून एकत्र खेळले होते. तसेच दोघेही एकमेकांचे चांगले मित्रही आहेत. दरम्यान, मिथुन मन्हास आणि आरती सेहवाग यांचा २०२१ मधील एक फोटो सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावरून लोक अधिकच शंका घेत आहेत. मात्र या प्रकरणी वीरेंद्र सेहवाग, आरती सेहवाग आणि मिथुन मन्हास यांच्यापैकी कुणाचीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तसेच या अफवांना दुजोरा देणारा कुठलाही सबळ पुरावाही समोर आलेला नाही.
दरम्यान, वीरेंद्र सेहवाग आणि आरती सेहवाग यांची अनेक वर्षांपासून मैत्री होती तसेच २००४ साली ते विवाहबद्ध झाले होते. या दोघांनाही दोन मुलगे आहेत. तसेच वीरेंद्र सेहवागसुद्धा निवृत्तीनंतर संसारात रमला होता. मात्र यावर्षाच्या सुरुवातीला वीरेंद्र सेहवाग आणि आरतीमध्ये भांडण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये हे दोघेही कारमध्ये एकमेकांसोबत भांडताना दिसले होते. तेव्हा पासून दोघांमध्ये सारं काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली होती. वीरेंद्र सेहवाग आणि आरतीने एकमेकांना सोशल मीडियावरून अनफॉलो केलं होतं. एवढंच नाही तर दोघेही वेगळे राहत असून, ते लवकरच अधिकृतरीत्या घटस्फोट घेतील, असा दावाही काही वृत्तांमधून करण्यात येत होता.