Join us

धुमशान 'बॅटिंग' करणाऱ्या वीरूचीच नेटकऱ्यांनी उडवली दांडी; 'ती' इच्छा भारी पडली!

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकासह अन्य महत्त्वाच्या पदांवर येत्या काही दिवसात निवड करण्यात येईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 18:05 IST

Open in App

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकासह अन्य महत्त्वाच्या पदांवर येत्या काही दिवसात निवड करण्यात येईल. पण, भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने थेट निवड समिती प्रमुख होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वीरु नेहमीच त्याच्या हटके ट्विट्समुळे चर्चेत राहतो. आताही तो अशाच एका ट्विट्सने चर्चेत आला आहे. त्यानं मला सिलेक्टर व्हायचे आहे, पण मला कोण संधी देत नाही, असं ट्विट केले. त्यावरून नेटिझन्सकडून त्याला मजेशीर उत्तरं मिळाली.  वीरूनं 104 कसोटी, 251 वन डे आणि 19 ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटीत त्यानं 49.34 च्या सरासरीनं 8586 धावा केल्या आहेत. 319 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे आणि त्याने एकूण 23 शतकं व 32 अर्धशतकं केली आहेत. वन डेत त्याच्या नावावर 8273 धावा आहेत. त्यात 15 शतकं व 38 अर्धशतकांचा समावेश आहे. 19 ट्वेंटी-20त त्यानं 394 धावा केल्या आहेत. 

नेटिझन्सने दिलेली उत्तरं...  

टॅग्स :विरेंद्र सेहवागसोशल मीडियाभारतीय क्रिकेट संघ