Virender Sehwag Wife Arti Viral Video : भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आहे. वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अहलावत यांच्यात सारं आलबेल नसल्याचा असा दावा काही रिपोर्ट्समध्ये केला केला जात आहे. असेही म्हटले जात आहे की दोघे काही काळापासून वेगळे राहत आहेत आणि लवकरच घटस्फोट घेणार आहेत. या मुद्द्यावर जोडप्याकडून कोणतेही विधान आलेले नाही. पण या सगळ्या चर्चांमध्ये सेहवाग आणि आरती यांच्यात कारमधील भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सेहवाग आणि आरती यांचे खरंच कारमध्ये भांडण झालं का?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती कारमध्ये बसलेले दिसतात. दोघेही एकमेकांशी रागाने भांडताना दिसतात. दोघेही खूप संतापलेले दिसतात आणि त्वेषाने वाद घालताना दिसतात. या व्हायरल व्हिडिओच्या आधारे सतत विविध प्रकारचे दावे केले जात आहेत. काही चाहत्यांचा असा विश्वास आहे की या भांडणामुळेच या जोडप्याचे नाते बिघडले आहे. पण हा व्हिडीओ खोटा, बनावट आहे. हा व्हिडिओ एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंसद्वारे तयार केला गेलेला आहे आणि तो सोशल मीडियावर खोट्या दाव्यासह शेअर केला जात आहे.
सेहवाग-आरती ग्रे डिव्होर्स घेणार असल्याची चर्चा
सेहवाग आणि आरती बऱ्याच काळापासून सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले नाहीत. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. त्यानंतर त्यांचे नाते तुटल्याच्या बातम्या येत आहेत. यादरम्यान, सेहवाग आणि आरती ग्रे डिव्होर्स घेणार असल्याच्या बातम्या येत आहेत. सोप्या शब्दांत सांगायचे तर, जर पती-पत्नी ४० ते ५० किंवा त्याहून अधिक वयाच्या वयात वेगळे होण्याचा निर्णय घेत असतील, तर त्याला ग्रे डिव्होर्स म्हणतात.
लग्नाला झाली २० वर्षे
सेहवाग आणि आरतीचे लग्न २२ एप्रिल २००४ रोजी झाले होते. यानंतर दोघेही आर्यवीर सेहवाग आणि वेदांत सेहवाग या दोन मुलांचे पालक झाले. सेहवाग आणि आरती दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. २००२ मध्ये सेहवागने आरतीला लग्नासाठी प्रपोज केले त्यानंतर त्यांची लग्न झाले.