Join us

विराट सुसाट! फटकावले 34 वे वनडे शतक 

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने आज पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना आपल्या बॅटचा इंगा दाखवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 19:46 IST

Open in App

केप टाऊन - जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने आज पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना आपल्या बॅटचा इंगा दाखवला. विराटने तुफान फटकेबाजी करत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतकाला गवसणी घातली. विराटचे या मालिकेतील हे दुसरे तर  एकदिवसीय क्रिकेटमधील 34 शतक ठरले. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा पहिल्याच षटकात माघारी परतला. मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विराटने शिखर धवनच्या साथीने भारताचा डाव सावरला. त्याने धवनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 140 धावांची भागीदारी केली. त्यानंतर इतर फलंदाजांसह छोट्या भागीदाऱ्या रचत भारतीय संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली.  

टॅग्स :विराट कोहलीक्रिकेटभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८भारतीय क्रिकेट संघ