Join us

विराट कोहलीनं फिल्मी स्टाईलनं दिल्या पत्नी अनुष्का शर्माला शुभेच्छा

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला लॉकडाऊनमुळे पत्नी अनुष्का शर्माचा वाढदिवस साधेपणानं साजरा करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 12:20 IST

Open in App

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला लॉकडाऊनमुळे पत्नी अनुष्का शर्माचा वाढदिवस साधेपणानं साजरा करावा लागला. बॉलिवूड अभिनेत्री अऩुष्कानं शुक्रवारी 32वा वाढदिवस घरच्याघरी साजरा केला. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीनदा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या कालावधित क्रिकेटपटूंना आपापल्या कुटुंबीयांना वेळ द्यायला मिळत आहे. कोहलीनं शुक्रवारी संध्याकाळी अनुष्काला फिल्मी स्टाईलनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

अनुष्का आयुष्यात आली अन् सर्व काही बदललं, असं अनेकदा विराटनं सांगितले आहे. तिच्या शांत स्वभावातून विराटही बरंच काही शिकला. त्यामुळे त्यानं अनुष्काला शुभेच्छा देताना म्हटलं की,''या जगात आशेचा प्रकाश आण.  माझं आयूष्य तू नेहमी प्रकाशमय करतेस. I love you'' कोहलीच्या या इंस्टाग्रमा पोस्टला अल्पावधीतंच लाखो लाईक्स मिळाले. टीम इंडियाचा फिरकीपटू हरभजन सिंग यानेही अनुष्काला शुभेच्छा दिल्या. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन आणि अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खान यांनीही शुभेच्छा दिल्या.  

Shoaib Akhtar अन् पीसीबी यांच्यातील वाद आणखी चिघळणार; माजी गोलंदाजाचा पलटवार 

Herschelle Gibbs करणार 'त्या' ऐतिहासिक खेळीच्या बॅटचा लिलाव 

न्यूझीलंडची महिला खेळाडू लै डेंजर; रोहित, सचिनसह कुणालाच नाही जमला हा पराक्रम

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मा