Shoaib Akhtar अन् पीसीबी यांच्यातील वाद आणखी चिघळणार; माजी गोलंदाजाचा पलटवार

वक्तव्यावर शोएब अख्तर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 10:03 AM2020-05-02T10:03:40+5:302020-05-02T10:04:05+5:30

whatsapp join usJoin us
Shoaib Akhtar vows to give befitting reply after receiving notice from PCB's legal advisor svg | Shoaib Akhtar अन् पीसीबी यांच्यातील वाद आणखी चिघळणार; माजी गोलंदाजाचा पलटवार

Shoaib Akhtar अन् पीसीबी यांच्यातील वाद आणखी चिघळणार; माजी गोलंदाजाचा पलटवार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ( पीसीबी) कायदे सल्लागार तफुज्जुल रिझवी यांच्यावरील आरोपानंतर माजी गोलंदाज शोएब अख्तर याला नोटिस पाठवण्यात आली. त्याला अख्तरनं सडेतोड उत्तर दिले असून हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पीसीबीचे कायदे सल्लागार रिझवी यांच्यावर अख्तरनं टीका केली होती. त्याला उत्तर म्हणून रिझवी यांनी 10 कोटींचा मानहानिकारक दावा करणारी नोटिस अख्तरला पाठवली. त्यांनी अख्तरला माफी मागण्यासही सांगितली आहे.

पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमल याच्यावर पीसीबीनं तीन वर्षांच्या बंदीची कारवाई केली. त्यावरून अख्तरनं एक व्हिडीओ अपलोड केला आणि त्यात त्यानं पीसीबीच्या कायदे विभाग आणि वकील तफज्जुल रिझवी यांच्यावरी गंभीर आरोप केले.  अख्तरने यू ट्युबर अपलोड केलेल्या व्हिडीओत पीसीबीच्या कायदे विभागावर ताशेरे ओढले होते. ''पीसीबीचा कायदे विभाग नालायक आहे आणि रिझवी हे पण तसेच आहेत,''असा आरोप अख्तरनं केला होता.'' त्याच्या विधानाची गंभीर दखल घेताना पीसीबीचे कायदे सल्लागार रिझवी यांनी त्याला नोटिस पाठवली आहे. 
 


आता अख्तरनं म्हटलं की,''पीसीबीचा कायदे विभाग भ्रष्टाचारात बरबटलेला आहे. रिझवी त्यामधील एक आहेत. त्यांचा या भ्रष्टाचाराशी त्यांचा संबंध आहे आणि गेली 10-15 वर्ष ते पीसीबीसोबत काम करत आहे. माझ्या वकिलांनी त्या नोटिशीला उत्तर पाठवलं आहे. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे.''
 

Web Title: Shoaib Akhtar vows to give befitting reply after receiving notice from PCB's legal advisor svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.