Join us

किंग कोहली पुन्हा डीपफेक व्हिडिओचा शिकार; प्रिन्स शुबमन गिल ठरला 'बळीचा बकरा'

किंग कोहली या व्हिडिओत शुबमन गिलच्या विरोधात 'बोलंदाजी' करत असल्याचा सीन क्रिएट करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 17:37 IST

Open in App

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली याचा आणखी एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कोहलीच्या जुन्या मुलाखत एडिट केला आहे. यात तो शुबमन गिलच्या विरोधात 'बोलंदाजी' करत असल्याचा सीन क्रिएट करण्यात आला आहे. ३३ सेकंदाच्या या व्हिडिओत किंग कोहली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्वत:समोर शुबमन गिल किरकोळ आहे, असे सांगताना दिसते.

किंग कोहली दुसऱ्यांदा झाला डीपफेक व्हिडिओचा शिकार

विराट कोहली डीपफेक व्हिडिओचा शिकार होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी  एका सट्टेबाजी अ‍ॅपची जाहिरातीचा सीनमुळे तो चर्चेत आला होता. याच वर्षातील फेब्रुवारीमध्ये हा प्रकार घडला होता. त्यात आता नव्या व्हिडिओची भर पडलीये.   

व्हायरल व्हिडिओतून कोणती गोष्ट रंगवण्यात आलीये?

 जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात विराट कोहलीच्या तोंडी जे शब्द आहे ते असे की,   मी शुबमन गिलला खूप जवळून पाहतोय. तो एक प्रतिभावंत खेळाडू आहे, यात कोणतीही शंका नाही. पण आपल्यातील कसब दाखवणे आणि स्टार होणं यात खूप मोठं अंतर असते. गिल टेक्निकली स्ट्राँग आहे. त्याला लोक भविष्यातील विराट कोहली, असे म्हणत आहेत. पण मी एक गोष्ट स्पष्ट करतो ती म्हणजे विराट कोहली फक्त एकच आहे. मी ज्या परिस्थितीत खेळलो, ज्या गोलंदाजांसमोर धावा केल्या त्याची तुलना गिलच्या कामगिरीशी होऊ शकत नाही. ही गोष्ट साध्य करण्यासाठी त्याला खूप वेळ लागेल.  

जे घडंत ते थांबवायचं कसं? हा खरंच मोठा प्रश्न 

शुबमन गिल हा भारतीय संघाचे भविष्य असल्याचे मानले जाते. त्यामुळेच त्याला प्रिन्स अशी उपमाही देण्यात आली आहे.   मास्टर ब्लास्टरचा वारसा पुढे नेणाऱ्या किंग कोहलीनंतर तो क्रिकेट जगतात अधिराज्य गाजवेल, असे बोलले जाते. ही गोष्ट होणार की नाही, ते येणारा काळच ठरवेल, पण डीपफेक व्हिडिओच्या माध्यमातून जे घडलं ते विकृत बुद्धी डिजिटल दुनियेतील काळजीचा मुद्दा आहे हे दाखवणारी आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर कोणत्या स्तरावर जाईल? इथं कोण कुणाचा वापर कशासाठी करेल याचा काही नेम नाही, असेच चित्र यातून निर्माण होते. 

टॅग्स :विराट कोहलीऑफ द फिल्डशुभमन गिलभारतीय क्रिकेट संघ