दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघातील फलंदाज धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहेत. कोलकाता कसोटी सामन्यात फिरकीच्या जाळ्यात फसल्यावर गुवाहाटीच्या खेळपट्टीवर जलदगती गोलंदाज मार्को यान्सेनचा भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टीम इंडियाला खिंडीत पकडले असताना आता सोशल मीडियावर विराट कोहलीच्या सहकाऱ्याची पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय कसोटी संघाला भासतीये किंग कोहलीची उणीव
भारतीय संघातील महान फलंदाज विराट कोहली याने इंग्लंड दौऱ्याआधी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. त्याच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला होता. कोहलीच्या निवृत्तीमुळे कसोटीची टेस्टच नाहीशी होईल, अशा प्रतिक्रियाही उमलटल्याचे पाहायला मिळाले होते. आता अंडर १९ क्रिकेटसह RCB च्या ताफ्यातून विराट कोहलीसोबत खेळताना दिसलेल्या श्रीवत्स गोस्वामीनं कसोटी क्रिकेटमध्ये त्याची उणीव जाणवत आहे, अशी भावना व्यक्त केली आहे.
IND vs SA ODI Series : रोहित-विराट मिळून रचणार नवा इतिहास! सचिन-द्रविडचा महारेकॉर्ड पडणार मागे
कोहलीच्या सहकाऱ्याची पोस्ट व्हायरल
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाची बिकट अवस्था पाहून किंग कोहलीच्या सहकाऱ्याने खास पोस्ट शेअर करत केली आहे. भारतीय कसोटी संघात कोहलीची उणीव भासते आहे, अशी भावना व्यक्त करताना त्याने पोस्टमध्ये लिहिलंय की, "विराटने वनडे क्रिकेट खेळणं थांबवायला हवं होतं आणि टेस्ट क्रिकेट तोपर्यंत खेळत राहायला हवं होतं, जोपर्यंत तो संघासाठी योगदान देऊ शकतो. फक्त एक खेळाडू म्हणून नव्हे तर तो संघाला कमालीची ऊर्जा देण्यातही तो सर्वात पुढे असतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकून देण्याची एक अविश्वसनीय क्षमता त्याच्यात आहे."
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानात एकही कसोटी मालिका नाही गामवली
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर विराट कोहलीनं कसोटीत धमक दाखवण्यासाठी रणजी सामना खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेईल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. पण इंग्लंड दौऱ्याआधी विराट कोहलीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत कसोटी क्रिकेटमधून थांबण्याची घोषणा केली. कोहलीने फलंदाजीशिवाय कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्वाची खास छाप सोडली होती. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.