नागपूर - भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतकी खेळी करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. बिकट परिस्थितीत एक बाजू लावून धरत फटकावलेले शतक हे विराटचे एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीमधील 40 वे शतक ठरले आहे. त्याबरोबरच एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 40 शतके पूर्ण करण्याचा विक्रमही विराटच्या नावावर नोंदवला गेला आहे.भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रिक केले होते. गोलंदाजांना साथ देणाऱ्या जामठाच्या खेळपट्टीवर इतर फलंदाजांकडून निराशा होत असताना बिकट परिस्थितीमध्ये विराटने खेळपट्टीवर तग धरला. त्याने एक बाजू लावून धरत शतक फटकावले. आजचे शतक हे विराटच्या एकदिवसीय कारकिर्दीमधील 40 वे शतक ठरले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- 'विराट'चालिसा! कोहलीकडून 40व्या शतकासह विक्रमांचा धडाका
'विराट'चालिसा! कोहलीकडून 40व्या शतकासह विक्रमांचा धडाका
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतकी खेळी करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 17:20 IST
'विराट'चालिसा! कोहलीकडून 40व्या शतकासह विक्रमांचा धडाका
ठळक मुद्दे बिकट परिस्थितीत एक बाजू लावून धरत फटकावलेले शतक हे विराटचे एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीमधील 40 वे शतक ठरले विराट कोहलीने 224 एकदिवसीय सामने आणि 216 डावात 40 शतके पूर्ण करण्याची किमया साधली कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात जलद नऊ हजार धावा करणारा कोहली हा पहिला खेळाडू