Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीने महेंद्रसिंग धोनीसाठी केलेले ट्विट ठरले सर्वात हिट...

कोहलीने नेमके काय ट्विट केले होते, ते जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 15:46 IST

Open in App

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा आज खोवला गेला आहे. कारण क्रीडा विश्वात धोनीच्या शब्दाला किती मान आहे, पुन्हा एकदा दिसून आले आहे.

जगभरात अब्जावधी लोकं ट्विटरवर आपल्या पोस्ट करत असतात. ट्विटरने या वर्षांतील सर्वाधिक लोकप्रिय ट्विटची यादी जाहीर केली आहे. यामध्ये क्रीडा विश्वात कोहलीचे ट्विट सर्वाधिक लोकांच्या पसंतीस उतरल्याचे पाहायला मिळाले आहे. पण कोहलीचे ट्विट नेमके होते तरी काय, याचा विचार आता तुम्ही करत असाल...

या पुरस्कारांमध्ये वर्षातील सुवर्ण ट्विट हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ठरले आहे. मोदी यांनी, 'सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत' असे ट्विट केले होते. हे या वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय ट्विट ठरले होते.

कोहलीने ७ जुलै या दिवशी एक ट्विट केले होते. या दिवशी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस होता. कोहलीने यावेळी त्याच्याबरोबर धोनीचा असलेला एक फोटो शेअर केला होता. या फोटोखाली कोहलीने लिहिले होते की, " माही, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. फार कमी व्यक्तींना विश्वास आणि सन्मान यांचा अर्थ समजतो. मला आनंद आहे की, बऱ्याच वर्षांपासून माझी आणि धोनीची मैत्री आहे. मी यापूर्वीही म्हटले आहे की, तू आम्हा सर्वांचा मोठा भाऊ आहेस. तू नेहमीच माझा कर्णधार राहशील."

टॅग्स :विराट कोहलीनरेंद्र मोदीट्विटर