Join us  

लॉकडाऊनमध्ये घरबसल्या विराट कोहलीनं कमावले कोट्यवधी; जाणून घ्या कसे!

कोरोना व्हायरसच्या संकटात जगभरातील क्रीडा स्पर्धा जवळपास दीड महिने बंद होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 11:20 AM

Open in App

कोरोना व्हायरसच्या संकटात जगभरातील क्रीडा स्पर्धा जवळपास दीड महिने बंद होत्या. आता हळुहळू स्पर्धांना सुरुवात होत आहे. या कठीण प्रसंगात अनेक जणांवर आर्थिक संकट ओढावले आहे. पण, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं घर बसल्या जवळपास 3.6 कोटी रुपये कमावले आहेत.  

लॉकडाऊनच्या काळात इंस्टाग्रावर पोस्ट करून कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये पोर्तुगाल आणि युव्हेंटसचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्यानं 12 मार्च ते 14 मे या कालावधीत जवळपास 17.9 कोटी रुपये इंस्टाग्रावर पोस्टवरून कमावले. रोनाल्डोचे इंस्टाग्रामवर 22.2 कोटी फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या खेळाडूंमध्ये तो अव्वल स्थानावर आहे.  

बार्सिलोना क्लबचा लिओनेल मेस्सीनंही लॉकडाऊनमध्ये 4 पोस्ट केल्या आणि 15.1 फॉलोअर्स असलेल्या अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटूनं 12.3 कोटी रुपये कमावले. ब्राझिलचा फुटबॉलपटू नेयमार 4 पोस्ट करून 11.4 कोटींच्या कमाईसह तिसऱ्या स्थानावर आहे.

एनबीए स्टार शकील ओ'नीलचे इंस्टाग्रामवर 1.7 कोटी फॉलोअर्स आहेत. शकीलनं 16 पोस्टमधून 5.5 कोटी कमावले आहेत. इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहमची जादू अजूनही कायम आहे. बेकहमनं केवळ तीन पोस्ट करून 3.8 कोटी कमावले आहेत. त्याचे 6.3 कोटी फॉलोअर्स आहेत.

कोहली सहाव्या क्रमांकावर आहे. पण, टॉप 10 मध्ये तो एकमेव भारतीय आणि क्रिकेटपटू आहे. विराटनं लॉकडाऊनमध्ये 3 स्पॉन्सर पोस्ट केल्या आणि त्यातून त्याला ही रक्कम मिळाली. त्यानं एका पोस्टसाठी सरासरी 1.2 कोटी रुपये कमावले. इंस्टाग्रामवर कोहलीचे 6.2 कोटी फॉलोअर्स आहेत.

आपला गडी मागे राहिला; विराट कोहलीला 'या' हॉट मॉडल्सनी टाकलं पिछाडीवर!

Viral Video : 7 वर्षांच्या मुलीचा ‘Helicopter shot’ पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

टॅग्स :विराट कोहलीख्रिस्तियानो रोनाल्डोलिओनेल मेस्सीइन्स्टाग्राम