Virat Kohli Record: अवघ्या पाच धावा काढताच विराट कोहलीच्या नावावर होणार 'जम्बो' विक्रम; वाचा कोणता?

Virat Kohli Records, IND vs NZ Champions Trophy 2025 Final: भारतीय संघ येत्या रविवारी न्यूझीलंड विरूद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 20:19 IST2025-03-07T20:02:48+5:302025-03-07T20:19:39+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli needs five runs to become India top run-scorer in the ICC finals in ODI format IND vs NZ Champions Trophy 2025 Final | Virat Kohli Record: अवघ्या पाच धावा काढताच विराट कोहलीच्या नावावर होणार 'जम्बो' विक्रम; वाचा कोणता?

Virat Kohli Record: अवघ्या पाच धावा काढताच विराट कोहलीच्या नावावर होणार 'जम्बो' विक्रम; वाचा कोणता?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli Records, IND vs NZ Champions Trophy 2025 Final : भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ९ मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. आतापर्यंत भारताने चार सामने खेळले आहेत. त्यातील पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया अशा दोन महत्त्वाच्या सामन्यांमध्ये विराटने आपली फलंदाजीतील चमक दाखवून दिली. पाकिस्तानविरूद्ध विराटने नाबाद शतक ठोकले तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध विराटने ८४ धावांची अप्रतिम खेळी केली. आता अवघ्या पाच धावा करून विराटला एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

विराटला अवघ्या पाच धावांची गरज

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यात विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. विराटने दमदार शतक ठोकावे अशी भारतीयांना आशा आहे. असे असले तरीही, अवघ्या पाच धावा करुनही विराट एका मोठ्या विक्रमाला गवसणी घालणार आहे. ICC कडून सध्या वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा दोन स्पर्धा वनडे फॉरमॅटमध्ये खेळल्या जातात. या स्पर्धांच्या फायनलमध्ये खेळताना भारताकडून सर्वाधिक धावा करण्याची संधी विराट कोहलीला आहे.

सौरव गांगुलीला टाकणार मागे

भारताकडून आतापर्यंत सौरव गांगुली चार वेळा ICCच्या वनडे स्पर्धांच्या फायनलमध्ये खेळला आहेत. या चार फायनलमध्ये मिळून गांगुलीने ७०च्या सरासरीने १४१ धावा केल्या आहेत. दुसरीकडे  विराटनेही आतापर्यंत ICCच्या वनडे स्पर्धांमध्ये चार वेळा फायनलचे सामने खेळले असून ३४च्या सरासरीने १३७ धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत विराट कोहली जेव्हा फायनलच्या सामन्यात पाच धावा काढेल तेव्हा, ICCच्या वनडे स्पर्धांमधील फायनल्समध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय बनण्याचा मान विराट कोहलीला मिळेल.

या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक अडम गिलख्रिस्ट अव्वल आहे. त्याने आतापर्यंत ICC फायनल्समध्ये सर्वाधिक २६२ धावा केल्या आहेत. 

Web Title: Virat Kohli needs five runs to become India top run-scorer in the ICC finals in ODI format IND vs NZ Champions Trophy 2025 Final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.