Mohammed Shami On Virat Kohli : मोहम्मद शमी हा सध्या दुलिप करंडक स्पर्धेत खेळत आहे. पूर्व विभाग संघाकडू पुन्हा एकदा टीम इंडियाचे दरवाजे ठोठावण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मोहम्मद शमीनं नुकतीच दिलेली मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आहे. टीम इंडियात स्थान न मिळण्यापासून ते अगदी ड्रेसिंग रुममधील काही रंजक गोष्टीवर त्याने दिलखुलास गप्पा मारल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्याने एका गोष्टीमागे माजी कर्णधार विराट कोहलीच असावा असे म्हटले आहे. नेमकं किंग कोहलीसंदर्भात तो काय म्हणाला? जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर गोष्ट
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अन् मोहम्मद शमीनं घेतलं किंग कोहलीचं नाव
मोहम्मद शमीला ड्रेसिंग रुममधील सहकाऱ्यांसह क्रिकेट वर्तुळात 'लाला' या नावाने ओळखले जाते. न्यूज २४ ला दिलेल्या मुलाखतीत शमीला हे नाव कुणी दिलं? असा प्रश्न विचारण्यात आला होता. ड्रेसिंग रुममध्ये झालेल्या नामकरणामागे नेमकं कोण आहे, हे माहिती नाही. पण हे काम विराट कोहलीचं असावे, असे तो म्हणाला आहे.
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
नेमकं काय म्हणाला शमी?
आपल्या टोपण नावासंदर्भात मोहम्मद शमी म्हणाला की, "संघातील सर्व सहकारी मला 'लाला' या नावाने हाक मारतात. संघात नवीन कोणी आले तरी तेही हेच नाव घेऊन बोलवतात. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीलाही या नावाने ओळखलं जायचं. त्याचे नाव मला का? आणि कुणी दिलं हे माहिती नाही. पण हे नाव मला पर्मनंटली चिटकवण्यात आले आहे. यामागे कोहलीच असावा," असे सांगत भारतीय ड्रेसिंग रुममध्ये असल्या गोष्टीत विराट कोहली पुढे असतो हे देखील त्याने सांगितले.
टीम इंडियात धोनीसह-सौरवलाही मिळालंय टोपण नाव
शमीनं ड्रेसिंग रुममधील बारसं घालण्यात ज्या कोहलीचं नाव घेतलं तो टीम इंडियात चिकू या नावाने फेमस आहे. त्याला चिकू नावाने हाक मारणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला माही हे टोपण नाव मिळालं आहे. याशिवाय भारतीय क्रिकेट संघाची बांधणी करणारा कर्णधार सौरव गांगुली दादा या टोपण नावाने ओळखला जातो. रवींद्र जडेजाला संघातील सहकारी जड्डू या नावाने हाक मारतात.