इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या जोडीच्या तडाख्यासमोर भलेभले गोलंदाज हतबल झाले.. विराट-एबीच्या जोडीनं आयपीएलमध्ये सर्वोत्तम भागीदारीचीही नोंद केली आहे. 2008पासून आयपीएलला सुरुवात झाल्यापासून एबी दिल्ली डेअरडेव्हिल्स ( आताची दिल्ली कॅपिटल्स ) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळला. पण, आयपीएलचा सर्वोत्तम एकादश संघ निवडताना एबीनं कर्णधारपदाची माळ चेन्नई सुपर किंग्सच्या महेंद्रसिंग धोनीच्या गळ्यात टाकली आहे.
शाहिद आफ्रिदीची पंतप्रधानांवर टीका; म्हणाला, मदत करण्याचे सोडून मंत्री सुट्टीवर गेलेत!
एबीनं निवडलेल्या आयपीएल एकादश संघात सलामीची जबाबदारी दिल्ली डेअरडेव्हिल्सचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांच्याकडे सोपवली आहे. आयपीएलमध्येच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे दोन्ही फलंदाज स्फोटक समजले जातात. आयपीएलमध्ये सेहवागनं 2728 धावा चोपल्या आहेत. रोहितने मुंबई इंडियन्सला सर्वाधिक जेतेपद जिंकून दिले आहेत. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत तो तिसऱ्या स्थानी आहे.
तिसऱ्या स्थानी विराट कोहली आणि चौथ्या स्थानावर एबीनं स्वतःला ठेवलं आहे. एबीच्या संघात बेन स्टोक्स या एकमेव जलदगती मारा करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूनं स्थान पटकावलं आहे. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या धोनी आणि रवींद्र जडेजा यांचा नंबर लागतो. धोनीच्या नावावर तीन जेतेपद आहेत, तर जडेजानं 1927 धावा आणि 108 विकेट्स घेतल्या आहेत. अफगाणिस्तानच्या रशीद खान हा एकमेव फिरकीपटू या संघात आहे. जलद माऱ्याची जबाबदारी भुवनेश्वर कुमार, कागिसो रबाडा, जसप्रीत बुमराह यांच्या खांद्यावर आहे.
असा आहे संघ - वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, बेन स्टोक्स, महेंद्रसिंग धोनी ( कर्णधार-यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, कागिसो रबाडा, जसप्रीत बुमराह.
एबी डिव्हिलियर्सची फटकेबाजी पाहायला मिळणार; तीन संघांमध्ये अनोखा सामना रंगणार!
TikTok स्टारला करायचेय लोकेश राहुलशी लग्न; तिचे फोटो पाहून व्हाल 'बोल्ड'!
"तिथे मॅप बदलले जात आहेत, आपण इथे ॲप वर बंदी घालतोय, काय पोरकटपणा आहे!"
लोकेश राहुलसाठी पुन्हा एकदा 'कॉफी' डोकेदुखी ठरली; विराट कोहलीनंही फिरकी घेतली
कब्रस्तानमध्ये सराव करायचा टीम इंडियाचा 'हा' शिलेदार; सौरव गांगुलीनं बदललं आयुष्य!