Virat Kohli Avneet Kaur Instagram Like Controversy: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या IPL 2025 मध्ये खेळतो आहे. त्याच्या संघातील त्याची कामगिरी कौतुकास्पद आहे. पण नुकताच २३ वर्षीय टीव्ही अभिनेत्री अवनीत कौरचा इंस्टाग्राम वरील एक फोटो लाईक केल्यामुळे विराट चर्चेत आला. अवनीतच्या फोटोवर लाईक केल्याने त्याला ट्रोल करण्यात आले. या मुद्द्यावरून सोशल मीडियावर भरपूर चर्चा आणि ट्रोलिंग झाले. त्यानंतर आता विराट कोहलीने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट खूप व्हायरल झाला. त्यामध्ये कोहलीने अवनीत कौरचा फोटो लाईक केल्याचे दिसले. हा फोटो अवनीतच्या फॅन पेजवरून पोस्ट करण्यात आला होता. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आणि कोहलीची खिल्ली उडवली. प्रकरण वाढत असल्याचे पाहून अखेर विराट कोहलीने स्पष्टीकरण दिले, जेणेकरून यासंदर्भात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये. कोहलीने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी माझे फीड क्लियर करत असताना चुकून लाइक केले गेले असेल. यामागे कोणत्याही प्रकारचा विशिष्ट हेतू नव्हता. मी आवाहन करतो, की कोणतेही अनावश्यक अंदाजे लावले जाऊ नयेत. सर्वांचे आभार. मला आशा आहे की तुम्ही मला समजून घ्याल.
यंदाच्या IPL मध्ये कोहली जबरदस्त फॉर्मात
विराट कोहलीने यंदाच्या हंगामात १० सामन्यांमध्ये १३८.८७ च्या स्ट्राईक रेटने ४४३ धावा केल्या आहेत. यात सहा अर्धशतकांचा समावेश आहे. सध्याच्या हंगामात लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीने चार वेळा ५० पेक्षा जास्त धावांच्या खेळी केल्या आहेत. एवढेच नाही तर कोहली टी२० क्रिकेटमध्ये १३००० धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच तो जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे. कोहलीपूर्वी फक्त ख्रिस गेल, अॅलेक्स हेल्स, शोएब मलिक आणि कायरन पोलार्ड यांनीच टी२० मध्ये १३००० धावा पूर्ण केल्या आहेत.