भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची ( ICC) स्पर्धा जिंकण्यात अपयश आलं. नुकत्याच झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ( ICC World Test Championship) न्यूझीलंडनं ८ विकेट्स राखून टीम इंडियाला पराभूत केले. यापूर्वी २०१७च्या चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये आणि २०१९च्या वन डे वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला अपयश आले. पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट ( former Pakistan captain, Salman Butt ) यानं विराटच्या नेतृत्वातील त्रूटींबाबत मत व्यक्त केले आहे.
विराट कोहलीला इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL) जेतेपदही पटकावता आलेले नाही. २०१३ पासून त्याच्याकडे रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू ( RCB) संघाचे नेतृत्व आहे. जर कोहली असाच ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरत राहिला, तर त्याला कर्णधार म्हणून कोणीच लक्षात ठेवणार नाही, असे मत बटनं व्यक्त केलं. ''तू एक चांगला कर्णधार आहेस, परंतु जर तुझ्या नावावर जेतेपद नसेल तर तुला कर्णधार म्हणून कोण ध्यानात ठेवणार नाही. कदाचित तू चांगला कर्णधार आहेस आणि तू उत्तम रणनितीही आखतोस, परंतु तुझे गोलंदाज त्याची अंमलबजावणी करण्यात चुकतात. नशिबाचीही तुला साथ मिळणं गरजेची आहे. जो स्पर्धा जिंकलो, लोकं त्यालाच लक्षात ठेवतात,''असे बट म्हणाला.
Euro 2020 : गतविजेत्या पोर्तुगालचे आव्हान संपुष्टात; ख्रिस्तियानो रोनाल्डोनं केला देशाचा अपमान, Video Viral
''कधीकधी तुम्ही चांगले कर्णधार नसताही, परंतु तुम्हाला तगडा संघ मिळतो आणि तुम्ही प्रमुख स्पर्धांचे जेतेपद सहज पटकावता. त्यातून चांगला कर्णधार आहे हे सिद्ध होत नाही, परंतु जगासाठी मोठी स्पर्धा जिंकणाराच सर्वोत्तम कर्णधार आहे,''असेही बटने पुढे नमुद केले.
केन विलियम्सनकडून विराटनं नेतृत्व कौशल्य शिकायला हवेत, असेही बट म्हणाला, ''विराट कोहलीनं ना आयसीसीचे जेतेपद पटकावले आहे, ना आयपीएल... तो सर्वोच्च दर्जाचा क्रिकेटपटू आहे, आक्रमक खेळाडू आहे. त्याची एनर्जी लेव्हल एका वेगळ्याच स्तरावर असते आणि त्याला सतत सर्वोत्तम करून दाखवायचे असते. पण, कर्णधार हुशार असायला हवा तापट नाही.''