Virat Kohli Fitness Test In Englandआगामी आशिया कप आणि देशांतर्गत स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर युवा आणि अनुभवी खेळाडूंना बीसीसीआयने अनिवार्य केलेली फिटेनस टेस्ट द्यावी लागत आहे. कसोटी आणि टी-२० संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मासह जसप्रीत बुमराह आणि शुबमन गिल यासह अनेक भारतीय क्रिकेटर्संनी बंगळुरु येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस टेस्ट दिली. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली मात्र या मंडळींत दिसला नव्हता. टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर विराट कोहली फॅमिलीसोबत नेहमीप्रमाणे लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. कोहलीसाठी कायपण.. असं म्हणत बीसीसीआयनं तो जिथं आहे तिथंच त्याची फिटनेस टेस्ट घेतल्याची माहिती समोर येत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंग्लंडमध्ये झाली विराट कोहलीची यो यो टेस्ट (Virat Kohli Yo Yo Fitness Test In England)
टी-२० पाठोपाठ कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यावर विराट कोहली फक्त वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून तो पुन्हा आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियात सहभागी होण्यासाठी अनिवार्य असणारी फिटनेस टेस्ट त्याने इंग्लंडमध्ये दिली आहे. फिजिओनं त्याच्या फिटनेस संदर्भातील रिपोर्ट बीसीसीआयला सुपूर्द केल्याचेही समजते. बीसीसीआयनं यासंदर्भात अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही.
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट! पास की नापास, काय आला निकाल? संघात स्थान मिळणार?
किंग कोहलीला सॉफ्ट कॉर्नर
सातत्याने होणाऱ्या द्विपक्षीय मालिका अन् इतर स्पर्धेसह फ्रँचायझी क्रिकेटमुळे खेळाडूंवरील वर्कलोड अधिक वाढला आहे. त्यामुळेच बीसीसीआयकडून मोठ्या स्पर्धेआधी तसेच मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून दूर असणाऱ्या खेळाडूंना फिटनेस सिद्ध करणे अनिवार्य करण्यात आले आहे. एका बाजूला सर्व खेळाडू बंगळुरुस्थित बीसीसीआय सेंटरमध्ये टेस्टसाठी हजेरी लावत असताना दुसऱ्या बाजूला विराट कोहलीसाठी परदेशात स्वतंत्र फिटनेस टेस्टची व्यवस्था करणं हे अनेक प्रश्न उपस्थितीत करणारे आहे. एका बाजूला सरसकट सर्व खेळाडूंनी देशांतर्गत स्पर्धेत खेळा तरच टीम इंडियात एन्ट्री मिळेल, असे म्हणत स्टारडम कल्चर संपवल्याचा आव आणणाऱ्या बीसीसीआय विराट कोहलीसंदर्भात अजूनही सॉफ्ट कॉर्नर घेतंय, असेच चित्र यातून दिसून येते.