Join us  

आम्ही सराव थांबवला, पण विराट कोहली अडीच तास नेटमध्ये घाम गाळत होता!, राशिद खानकडून कौतुक

आशिया चषकासाठी सर्व 6 देशाचे संघ यूएईत दाखल झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 3:40 PM

Open in App

नवी दिल्ली : लवकरच आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) च्या स्पर्धेस सुरूवात होणार असून पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान (SL vs AFG) यांच्यामध्ये पार पडणार आहे. तर स्पर्धेचे प्रबळ दावेदार आणि कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) रविवारी 28 ऑगस्ट रोजी आमनेसामने असणार आहेत. या बहुचर्चित स्पर्धेसाठी एकूण 6 संघ रिंगणात असतील, जे सर्व संघ यूएईत दाखल झाले आहेत. खरं तर यंदा आशिया चषकाचा थरार श्रीलंकेत रंगणार होता. दरम्यान, भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली एका मोठ्या कालावधीनंतर क्रिकेट खेळणार आहे. कोहलीला मागील जवळपास 3 वर्षांपासून एकही शतकी खेळी करता आली नाही.

आगामी आशिया चषकासाठी सर्व संघ यूएईत दाखल झाले असून सराव करत आहेत. अशातच अफगाणिस्तानच्या राशिद खानने किंग कोहलीचे तोंडभरून कौतुक केले आहे. तसेच विराट फॉर्ममध्ये नाही असे म्हणणाऱ्या टोला देखील लगावला आहे. आयपीएलमध्ये विराट सामन्याआधी जवळपास 2.5 तास सराव करत होता, असे राशिदने म्हटले. "आयपीएल दरम्यान मी त्याच्याशी बोललो आणि मला वाटत नाही की लोक काय बोलत आहेत याचा त्याला फारसा त्रास झाला नाही. तो खूप मेहनत घेतो आणि त्याच्याकडे पाहून आम्ही तेच करण्यास प्रेरित होतो, असे राशिद खानने अधिक सांगितले. 

विराट कोहली अडीच तास नेटमध्ये घाम गाळत होतास्पोर्ट्स प्रेझेंटर सवेरा पाशा यांच्याशी बोलताना राशिद खान म्हणाला, "आयपीएलदरम्यान आमचा दुसऱ्या दिवशीचा सामना विराट कोहली असलेल्या आरसीबीविरुद्ध होता. विराट कधी फलंदाजीसाठी नेटवर येईल याची मी वाट पाहत होतो. तो सुमारे अडीच तास फलंदाजी करत राहिला, मला खूप आश्चर्य वाटले, आमचे नेट सत्र संपले तरीदेखील तो तिथेच फलंदाजी करत होता. दुसऱ्या दिवशी त्याने आमच्याविरुद्ध 70 धावा केल्या होत्या तेव्हाही नेहमीसारखी त्याची मानसिकता खूप सकारात्मक होती."

आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूड्डा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.  

आशिया चषकासाठी अफगाणिस्तानचा संघ -  मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह जादरान (उपकर्णधार), अफसर झझई, अजमतुल्ला ओमरझाई, फरीद अहमद मलिक, फजल हक फारुकी, हशमतुल्ला शाहिदी, हजरतुल्ला झझई, इब्राहिम जादरान, करीम जनत, मुजीब उर रहमान, नजीबुल्लाह जादरान, नूर अहमद, नजीबुल्ला जादरान, नूर अहमद रहमानउल्ला गुरबाज, राशिद खान, समीउल्लाह शिनवारी. राखीव खेळाडू - निजात मसूद, कैस अहमद, शराफुद्दीन अशरफ.

 

टॅग्स :एशिया कपआयपीएल २०२२विराट कोहलीइंडियन प्रीमिअर लीगभारतअफगाणिस्तान
Open in App