WTC Final 2023 : विराट कोहली राष्ट्रीय कर्तव्यावर परतला; १० भारतीय खेळाडू उद्या लंडनसाठी रवाना होणार

रॉ़यल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान रविवारी संपुष्टात आल्यानंतर विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत आज मुंबईत परतला अन् तो उद्या राष्ट्रीय कर्तव्यासाठी टीम इंडियासोबत लंडनसाठी रवाना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 05:29 PM2023-05-22T17:29:10+5:302023-05-22T17:30:10+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli, Ashwin, Siraj, Axar, Shardul, Thakur, Umesh & Unadkat will leave for England for WTC Final with head coach Rahul Dravid on tommorow | WTC Final 2023 : विराट कोहली राष्ट्रीय कर्तव्यावर परतला; १० भारतीय खेळाडू उद्या लंडनसाठी रवाना होणार

WTC Final 2023 : विराट कोहली राष्ट्रीय कर्तव्यावर परतला; १० भारतीय खेळाडू उद्या लंडनसाठी रवाना होणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

WTC Final 2023 : आयपीएल २०२३ नंतर विराट कोहली ब्रेक घेण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. रॉ़यल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान रविवारी संपुष्टात आल्यानंतर विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत आज मुंबईत परतला अन् तो उद्या राष्ट्रीय कर्तव्यासाठी टीम इंडियासोबत लंडनसाठी रवाना होणार आहे. भारतीय संघाला ७ ते ११ जून या कालावधीत लंडन येथे होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायची आहे. त्याची तयारी म्हणून टीम इंडियाच्या १० खेळाडूंची पहिली फळी २३ मे रोजी लंडनसाठी रवाना होतेय. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हाही त्यांच्यासोबत असणार आहे.  

भारतीय खेळाडूंची यादी 
विराट कोहली
मोहम्मद सिराज
आर अश्विन
शार्दूल ठाकूर
अक्षर पटेल
उमेश यादव
जयदेव उनाडकत
अनिकेत चौधरी ( नेट बॉलर)  
आकाश दीप ( नेट बॉलर)
यारा पृथ्वीराज ( नेट बॉलर) 

विराट कोहलीने शतक झळकावूनही RCBला अखेरच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्सकडून हार पत्करावी लागली आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आला. विराटसह मोहम्मद सिराजही या संघाचा भाग होता. उद्या सायंकाळी ४.३० वाजता पहिली बॅच रवाना होईल, असे बीसीसीआय सूत्रांनी PTI ला सांगितले.  


जयदेव उनाडकतला आयपीएल दरम्यान दुखापत झाली होती, परंतु त्याने फिटनेस टेस्ट पास केली आणि तोही लंडनसाठी रवाना होणार आहे. मात्र, तेथे जाऊन त्याला तंदुरुस्तीसाठी वैद्यकिय टीमच्या मार्गदर्शनाखाली रहावे लागेल. रोहित शर्मा, इशान किशन, शुबमन गिल, मोहम्मद शमी, केएस भरत आणि अजिंक्य रहाणे हे सध्या आयपीएलमध्ये आपापल्या संघांसोबत खेळत आहेत. चेतेश्वर पुजारा आधीच इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळतोय आणि तो तिथूनच टीम इंडियाच्या ताफ्यात दाखल होईल.  

Web Title: Virat Kohli, Ashwin, Siraj, Axar, Shardul, Thakur, Umesh & Unadkat will leave for England for WTC Final with head coach Rahul Dravid on tommorow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.