Join us  

विराटच्या शतकांचं 'अर्धशतक'; PM मोदी ते अमित शाहंपर्यंत अनेकांनी दिल्या शुभेच्छा; कोण काय म्हणालं?

विराट कोहलीच्या या विक्रमानंतर, देशातील अनेक नेत्यांनी त्याच्यावर सुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासह काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तथा प्रियंका गांधींचाही समावेश आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 7:52 PM

Open in App

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत, विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यांतील 50 वे शतक झककावत इतिहास रचला. एवढेच नाही, तर तो आता एकदिवसीय क्रेकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा खेळाडूही ठरला आहे. या विक्रमा बरोबरच विराटने क्रिकेटचा देव म्हणवल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला मागे सोडले आहे. सचिनने 452 एकदिवसीय डावांत 49 शतके झळकावली होती.

विराट कोहलीच्या या विक्रमानंतर, देशातील अनेक नेत्यांनी त्याच्यावर सुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासह काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तथा प्रियंका गांधींचाही समावेश आहे.

काय म्हणाले, पंतप्रधान मोदी? -पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज विराट कोहलीने केवळ 50 वे एकदिवसीय शतकच झळकावले नाही, तर उत्कृष्टता आणि दृढनिश्चयाचे उदाहरणही दिले आहे. त्याची ही उल्लेखनीय कामगिरी म्हणजे, त्याच्या चीरस्थायी समर्पणाचे आणि प्रतिभेचे प्रमाण आहे. मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. भावी पिढ्यांसाठी तो एक बेंचमार्क सेट करत आहे."

कायम म्हणाले अमित शाहगृह मंत्री अमित शाह म्हणाले, "एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 वे शतक झळकावल्याबद्दल आणि या ऐतिहासिक कामगिरीबद्दल विराट कोहलीचे अभिनंदन. हे आपल्या उत्कृष्ट खिलाडू वृत्ती, समर्पणाची भावना आणि सातत्याचे प्रमाण आहे. देशाला आपल्यावर अभिमान आहे."

प्रियंका गांधी काय म्हणाल्या? -काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनीही विराट कोहलीला शुभेच्छा दिल्या आहेत. त्या म्हणाल्या, "एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतके झळकावत केलेल्या विश्व विक्रमासाठी विराट कोहलीचे अभिनंदन. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडत पुन्हा एकदा हा हा विक्रम भारताच्या नावे केला आहे." यानंतर प्रियांका यानी भारतीय संघाच्या पुढील वाटचालीसाठीही शुभेच्छा दिल्या आहेत.

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले... -खर्गे म्हणाले, "विराट कोहली, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 शतके पूर्ण करून भारताचा गौरव वाढविल्याबद्दल आभार. हे आपली मेहनत आणि प्रतिभेचे प्रमाण आहे. हा आपला उल्लेखनीय विक्रम युवा क्रिकेटपटूंसाठी प्रेरणा दाई ठरेल आणि हे शतक क्रिकेट प्रेमिंसाठी आनंद घेऊन आले आहे. या अभूतपूर्व कामगिरीसाठी खूप खूप अभिनंदन. आम्ही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.

टॅग्स :विराट कोहलीनरेंद्र मोदीअमित शाहप्रियंका गांधीमल्लिकार्जुन खर्गेभारत विरुद्ध न्यूझीलंड