Join us

वनडे मालिकेपूर्वी विराट-अनुष्का साथ साथ !

विराट कोहलीच्या विजय उत्साहात सहभागी होण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का श्रीलंकेत पोहचली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 15:52 IST

Open in App
ठळक मुद्देटीम इंडियाने अपेक्षित विराट कामगिरी करताना श्रीलंकेला त्यांच्याच भूमीमध्ये लोळवले. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे.कोहलीच्या या विजय उत्साहात सहभागी होण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का श्रीलंकेत पोहचलीविराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या प्रेमप्रकरणाच्या जशा चर्चा रंगल्या अगदी तशाच त्यांच्या भेटीच्या चर्चाही अनेकदा रंगल्याचे पाहायला मिळाले.

कँडी, दि. 16 : टीम इंडियाने अपेक्षित विराट कामगिरी करताना श्रीलंकेला त्यांच्याच भूमीमध्ये लोळवले. विशेष म्हणजे 3 कसोटी सामन्यांची मालिका 3-0 अशी निर्विवादपणे जिंकून भारतीय संघाने परदेशात पहिल्यांदाच क्लीनस्वीप नोंदवला. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. कोहलीच्या या विजय उत्साहात सहभागी होण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का श्रीलंकेत पोहचली आहे. कसोटी मालिकेतील विजयानंतर कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री देखील दिसत आहेत. आणि काही श्रीलंकेचे फॅन्स देखील दिसत आहेत.सध्या टीम इंडिया तेथे वनडे सिरीजची तयारी करते आहे. मंगळवारी झालेल्या या भेटीचे काही फोटो समोर आले आहेत. विराट कोहली फॅन क्लबच्या इन्स्टाग्रामवरुन हा फोटो पोस्ट करण्यात आलाय. याशिवाय आणखी एका फॅन क्लब अकाऊंटवर देखील हा फोटो पोस्ट करण्यात आलाय. यामध्ये विराट, अनुष्का आणि प्रशिक्षक रवी शास्त्री श्रीलंकन चाहत्यांसोबत, असे कॅप्शन देण्यात आले असून या फोटोला विरुष्का असा हॅशटॅग दिला आहे.

( आणखी वाचा :  सिडनीमध्ये विराट-अनुष्काचा रोमान्स )

विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या प्रेमप्रकरणाच्या जशा चर्चा रंगल्या अगदी तशाच त्यांच्या भेटीच्या चर्चाही अनेकदा रंगल्याचे पाहायला मिळाले. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर विराट आणि अनुष्का न्यूयॉर्कमध्ये सुट्टीचा अस्वाद घेताना दिसून आले होते. काही वर्षांपूर्वी एका शाम्पूच्या जाहिरातीदरम्यान विराट आणि अनुष्काची ओळख झाली आणि थोड्याच दिवसात ते चांगले मित्र झाले. मात्र काही दिवसांनी ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या फिरू लागल्या. अनुष्काच्या मुंबईतील घराच्या पार्किंग लॉटमध्ये त्या दोघांना रात्री उशीरा एकत्र पाहिल्याचे एका फॅनने नमूद केले. पण त्या दोघांनीही आपल्या रिलेशनशीपबद्दल मौन सोडले नव्हते. मात्र विराटच्या एक मॅचसाठी अनुष्काने हजेरी लावल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाले. भारतीय संघाच्या वर्ल्डकपमधील सामन्यादरम्यानही अनुष्का शर्मा उपस्थित होती. त्यांच्या या जोडीमुळे त्यांचे चाहते खूपच खुश झाले.

( आणखी वाचा :  विराट-अनुष्का झाले वेगळे? )

 

विराट -अनुष्काचे आणखी काही फोटो जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

 

 

 

 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मा