Viral Video: गौतम गंभीरने सर्वांसमोर अभिषेक शर्माला झापलं? टीम बसमध्ये नेमकं काय घडलं?

Gautam Gambhir Abhishek Sharma Viral Video: विमानतळावरून हॉटेलकडे जाणाऱ्या बसमध्ये हा प्रकार घडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 22:24 IST2026-02-24T22:23:03+5:302026-02-24T22:24:43+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Viral Video Gautam Gambhir slapped Abhishek Shgautam gambhir heated chat with Abhishek Sharma on team bus goes viral ahead of IND vs ZIM Zimbabwe matcharma in front of everyone.. What exactly happened in the team bus? | Viral Video: गौतम गंभीरने सर्वांसमोर अभिषेक शर्माला झापलं? टीम बसमध्ये नेमकं काय घडलं?

Viral Video: गौतम गंभीरने सर्वांसमोर अभिषेक शर्माला झापलं? टीम बसमध्ये नेमकं काय घडलं?

Gautam Gambhir Abhishek Sharma Viral Video: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर ८ सामन्यात भारतीय संघाचा ७६ धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्धच्या 'करो वा मरो' सामन्यासाठी चेन्नईत दाखल झाला. त्यातच विमानतळावरून हॉटेलकडे जाणाऱ्या टीम बसमध्ये प्रशिक्षक गौतम गंभीर आणि फॉर्मात नसलेला अभिषेक शर्मा यांच्यात झालेल्या चर्चेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा

नेमकं काय घडलं?

व्हायरल व्हिडिओमध्ये गौतम गंभीर बसमध्ये ड्रायव्हरच्या मागील सीटवर अभिषेक शर्मासोबत बसलेला दिसला. गंभीर अत्यंत सिरियस चेहऱ्याने हातवारे करत अभिषेकला काहीतरी समजावून सांगताना किंवा झापताना दिसला. त्याच्या देहबोलीवरून तो अभिषेकच्या खराब कामगिरीवर नाराज असल्याचे स्पष्ट जाणवत होते. अभिषेक शर्मा सध्या मैदानात अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. या विश्वचषकातील त्याच्या मागील चार डावांची धावसंख्या ०, ०, ० आणि १५ अशी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने चांगली सुरुवात केली होती, पण तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की, गंभीर अभिषेक शर्माला झापतो आहे.

काहींनी याला गंभीरची 'बसमधील कोचिंग स्टाईल' म्हटले आहे. तर काहींनी त्याच्यावर टीका केली की, अशा चर्चा खाजगीत व्हायला हव्यात. एका युजरने म्हटले की, गंभीर सरांनी खेळाडूचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी रोहित शर्माकडून काही गोष्टी शिकायला हव्यात.

झिम्बाब्वेविरुद्धचा सामना महत्त्वाचा; बदलांची शक्यता

भारताचा नेट रन रेट (-३.८००) सध्या खूप खालावला आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला २६ फेब्रुवारीला चेपॉक स्टेडियमवर झिम्बाब्वेविरुद्ध मोठा विजय मिळवणे अनिवार्य आहे. अभिषेक शर्माच्या सततच्या अपयशामुळे आता संघात त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्याची मागणी जोर धरत आहे. गंभीर आणि अभिषेक यांच्यातील या गंभीर चर्चेनंतर, अभिषेकला अखेरची संधी मिळते की तो संघातून बाहेर पडतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Web Title : गौतम गंभीर ने अभिषेक शर्मा को डांटा? टीम बस में क्या हुआ?

Web Summary : दक्षिण अफ्रीका से भारत की हार के बाद, एक वीडियो सामने आया जिसमें कोच गौतम गंभीर टीम बस में अभिषेक शर्मा को डांटते हुए दिखाई दे रहे हैं। शर्मा के हालिया खराब प्रदर्शन के कारण जिम्बाब्वे के खिलाफ महत्वपूर्ण मैच के लिए टीम में उनकी जगह पर सवाल उठ रहे हैं, संजू सैमसन संभावित रूप से उनकी जगह ले सकते हैं।

Web Title : Gautam Gambhir Scolds Abhishek Sharma? What happened in the team bus?

Web Summary : Following India's loss to South Africa, a video surfaced showing coach Gautam Gambhir seemingly scolding Abhishek Sharma on the team bus. Sharma's recent poor performance is under scrutiny, leading to speculation about his place in the team for the crucial Zimbabwe match, with Sanju Samson potentially replacing him.