Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील २०२५-२६ च्या हंगामातील साखळी फेरीतील लढती गुरवारी संपल्या. एलिट गटातील ३२ संघातून चार गटातून प्रत्येकी २ संघानी क्वार्टरफायनलमध्ये जागा पक्की केली आहे. इथं एक नजर टाकुयात क्वार्टर फायनल अर्थात उपांत्य पूर्व फेरीसाठी पात्र ठरलेले ८ संघ आणि बाद फेरीत कोणता संघ कुणाविरुद्ध भिडणार याचे संपूर्ण वेळापत्रक
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
क्वार्टर फायनल कधी आणि कुठे?
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील क्वार्टर फायनलच्या लढती १२ आणि १३ जानेवारीला BCCI च्या बंगळुरु स्थित CoE च्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. कर्नाटक, मुंबई, उत्तर प्रदेश, सौराष्ट्र, पंजाब, मध्य प्रदेश दिल्ली आणि विदर्भ या संघांनी बाद फेरीत प्रवेश केला आहे. ९ वाजता सामन्याला सुरुवात होईल. क्वार्टर फायनलमधील विजेता संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरेल. या स्पर्धेतील अंतिम सामना १८ जानेवारीला नियोजित आहे.
सरफराज खानचा मोठा पराक्रम! विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सेट केला ‘फास्टेस्ट फिफ्टी’चा नवा विक्रम
लाईव्ह प्रसारण कुठे पाहता येईल?
- टीव्ही: स्टार स्पोर्ट्स
- ऑनलाइन: जिओहॉटस्टार (ॲप आणि वेबसाईट)
कोणता संघ कधी आणि कुणाविरुद्ध भिडणार?
- क्वार्टर फायनल १ : कर्नाटक विरुद्ध मुंबई- १२ जानेवारी, सकाळी ९ वाजता, CoE, बंगळुरू
- क्वार्टर फायनल २: उत्तर प्रदेश विरुद्ध सौराष्ट्र- १२ जानेवारी, सकाळी ९ वाजता CoE, बंगळुरू
- क्वार्टर फायनल ३ : पंजाब विरुद्ध मध्य प्रदेश- १३ जानेवारी, सकाळी ९ वाजता CoE, बंगळुरू
- क्वार्टर फायनल ४: दिल्ली विरुद्ध विदर्भ- १३ जानेवारी, सकाळी ९ वाजता CoE, बंगळुरू