न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेआधी भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि उप कर्णधार श्रेयस अय्यर देशांतर्गत क्रिकेटमधील विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. पंजाबच्या संघाकडून डावाची सुरुवात करताना शुभमन गिलच्या पदरी निराशा आली आहे. दुसरीकडे मुंबई संघाकडून दुखापतीतून सावरणाऱ्या श्रेयस अय्यरनं हिट शो दाखवून दिला. व्हाइट बॉल क्रिकेटमधील सातत्यपूर्ण खराब कामगिरीमुळे शुभमन गिलला टीृ२० वर्ल्ड कप संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात होता. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये फॉर्म दाखवून देईल, अशी अपेक्षा होती. पण तो इथंही अपयशी ठरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शुभमन गिलचा फ्लॉप शो! गोवा संघाविरुद्ध स्वस्तात फिरला माघारी
वनडेत टीम इंडियाचे नेतृत्व करणारा शुभमन गिल प्रभसिमरन सिंगच्या नेतृत्वाखालील पंजाबच्यासंघाकडून मैदानात उतरला होता. गोव्याचा संघ ३३.३ षटकात २११ धावांवर आटोपल्यावर पंजाबच्या संघाला २१२ धावांचे अल्प आव्हान मिळाले. कोणताही दबाव नसताना शुभमन गिलला फॉर्म दाखवण्याची एक चांगली संधी होती. त्याने प्रभसिमरन सिंगच्या साथीनं पंजाबच्या डावाची सुरुवात केली. प्रभसिमरनच्या रुपात पंजाबच्या संघाने ८ धावांवर आपली पहिली विकेट गमावली. त्यानंतर संघाला गिलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तो १२ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने ११ धावा करून स्वस्तात माघारी फिरला. पंजाबच्या दोन्ही सलामीवीरांना वासुकी कौशिक याने आपल्या जाळ्यात अडकवले.
कोण आहे Aman Rao Perala? IPL लिलावात फक्त ३० लाख मिळालेल्या २१ वर्षीय पठ्ठ्यानं द्विशतकासह रचला इतिहास
हिट शोसह श्रेयस अय्यरने सिद्ध केला फिटनेस
भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर याने मुंबई संघाच्या नेतृत्वाछी धुरा सांभाळत दोन महिन्यांनी क्रिकेटच्या मैदानात अगदी झोकात पुनरागमन केले. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील मुंबई आणि हिमाचल प्रदेश यांच्यातील सामना जयपूर येथील जयपूरीया विद्यालयाच्या मैदानात खेळवण्यात आला. धुक्यामुळे प्रत्येकी ३३-३३ षटकांचा खेळवण्यात आलेल्या या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रेयस अय्यरनं कर्णधाराला साजेशी खेळी करताना ५३ चेंडूत ८२ धावांची खेळी केली. त्याची ही खेळी १० चौकार आणि ३ षटकाराने बहरलेली होती. दुखापतीतून सावरताना त्याने हिट खेळीसह न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेसाठी फिट असल्याचे सिद्ध केले आहे. त्याची ही खेळी मुंबईच्या संघाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च खेळीही ठरली. त्याच्याशिवाय मुशीर खान याने धमाकेदार खेळी करत फिटनेस सिद्ध केला आहे. ५१ चेंडूत केलेल्या ७३ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई संघाने निर्धारित ३३ षटकात २९९ धावा करत हिमाचल प्रदेश संघासमोर ३०० धावांचे टार्गेट सेट केले.