Join us
Daily Top 2Weekly Top 5

Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!

सरफराज-मुशीर खान जोडी जमली; तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 14:22 IST

Open in App

Musheer Khan Received His Debut Cap In VHT From Brother Sarfaraz Khan : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील उत्तराखंड विरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघाने मुशीर खान या युवा अष्टपैलू खेळाडूला पदार्पणाची संधी दिली. खास गोष्ट ही की, त्याचा थोरला मोठा भाऊ आणि टीम इंडियाकडून खेळलेल्या सरफराज खान यानेच आपल्या धाकट्या भावाला मुंबई लिस्ट ए क्रिकेटमधील पदार्पणाची कॅप दिली. मुंबईच्या ताफ्यातील हा क्षण दोन्ही भावांसह खान कुटुंबियासह खास आणि अविस्मरणीय असा होता. एवढेच नाही तर या सामन्यात दोन्ही भावांनी अर्धशतकी खेळी करताना समान धावा काढल्या. त्यामुळे मुंबई विरुद्ध उत्तराखंड यांच्यातील सामन्यात एक कमालीचा योग पाहायला मिळाला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

सरफराज-मुशीर खान जोडी जमली; तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

मुंबईच्या संघाचा कर्णधार शार्दुल ठाकूर याने जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा माजी कर्णधार आणि मुंबईचा सलामीवीर बॅटर रोहित शर्मा या सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद झाला. युवा सलामीवीर अंगकृष्णही २० चेंडूत ११ धावांची भर घालून चालता झाला. मुंबईच्या संघाने २२ धांवार दोन्ही सलामीवीरांच्या विकेट गमावल्या होत्या. संघ अडचणीत असताना दोन्ही भावा भावांची जोडी जमली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९० चेंडूत १०७ धावांची भागीदारी रचत संघाला अडचणीतून बाहेर काढले.  पण दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर कमालीचा योगायोग पाहायला मिळाला. 

अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?

अर्धशतकानंतर दोघेही समान धावा करून परतले माघारी

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या मुशीर खान याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ७ चौकाराच्या मदतीने ५६ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला सरफराज खान याने ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५५ धावा केल्या. दोघे भाऊ तेवढ्याच सम-समान धावांचे योगदान देऊन माघारी फिरले. हा एक कमालीचा योगच  या सामन्यात पाहायला मिळाला. याशिवाय विकेट किपर बॅटर हार्दिक तोमरे याने केलेल्या नाबाद ९३ धावा आणि शम्स मुलानीच्या ४८ धावांच्या जोरावर मुंबईच्या संघान निर्धारित ५० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात ३३१ धावा करत उत्तराखंड संघासमोर ३३२ धावांचे टार्गेट सेट केल्याचे पाहायला मिळाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sarfaraz hands debut cap to Musheer, brothers score equal runs!

Web Summary : In Vijay Hazare Trophy, Sarfaraz Khan presented Musheer Khan his debut cap. Both brothers then scored 55 runs each, contributing to Mumbai's score of 331/7 against Uttarakhand, with Hardik Tamore's 93* and Shams Mulani's 48 adding to the total.
टॅग्स :विजय हजारे करंडकसर्फराज खानभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय