Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: मालिका विजयानंतर विराट कोहलीने सिंहाचलम मंदिरात घेतला भगवान विष्णूचा आशीर्वाद...

Virat Kohli Visited Simhachalam Temple: हे मंदिर भगवान विष्णूंच्या "वराह-नरसिंह" रूपाला समर्पित आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 15:16 IST

Open in App

Virat Kohli Visited Simhachalam Temple: भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा 2-1 ने धुव्वा उडवला. या सीरिजमध्ये विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. तीनपैकी दोन सामन्यात त्याने शतकीय खेळी केली, तर तिसऱ्या सामन्यात 65 धावांची नॉट आउट खेळी करत भारताला 9 विकेट्सने विजय मिळवून दिला. दरम्यान, या विजयानंतर कोहलीने थेट अरुणासिंहाचलम मंदिरात जाऊन भगवान विष्णूंचे दर्शन घेतले.

Video: यशस्वीने विराटला केक भरवला, रोहितकडे येताच हिटमॅन म्हणाला- 'नको रे, परत जाड होईल...'

कोहलीचा मंदिरातील व्हिडिओ व्हायरल

मालिका विजयानंतर विराट कोहली शनिवारी आंध्र प्रदेशातील सिंहाचलम टेकडीवरील प्रसिद्ध मंदिरात पोहोचला. हे मंदिर भगवान विष्णूंच्या "वराह-नरसिंह" रूपाला समर्पित आहे. ‘सिंहाचल’ शब्दाचा अर्थ सिंहाचा पर्वत. हे स्थान प्रभु नृसिंहाच्या निवासस्थान मानले जाते.

विराट कोहलीच्या सिंहाचलम मंदिर भेटीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात तो पांढऱ्या कंपड्यांमध्ये शांत भावनेने भगवान विष्णूचे दर्शन घेताना दिसतोय. आणखी एका व्हिडिओत तो मंदिरातील परंपरेनुसार पूजा करताना दिसतो.

कोहली मालिकावीर...

दक्षिण आफ्रिका मालिकेतील तीनही सामन्यात कोहलीने दमदार कामगिरी केली. पहिल्या वनडेमध्ये : 135 धावा (ऐतिहासिक शतक), दुसऱ्या वनडेमध्ये : 102 धावा (सलग दुसरे शतक), तर तिसऱ्या वनडेमध्ये : 45 चेंडूत नाबाद 65 धावा केल्या. एकूण 3 सामन्यात 302 धावा करत विराटला प्लेयर ऑफ द सीरिजचा किताब मिळाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Virat Kohli Seeks Blessings at Simhachalam Temple After Series Win

Web Summary : Following India's ODI series victory against South Africa, Virat Kohli visited the Simhachalam Temple in Andhra Pradesh. He sought blessings from Lord Vishnu, continuing celebrations after his stellar performance, including two centuries and a match-winning innings.
टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघरोहित शर्मामंदिर