Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी

Cricket Fight Viral Video: भांडणात एका खेळाडूने दुसऱ्याच्या बॅट मारल्याचे दिसून आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 00:24 IST

Open in App

Cricket Fight Viral Video: क्रिकेटला सज्जनांचा खेळ म्हटले जाते. मात्र क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा खेळाडूंमध्ये जोरदार वाद होतात. खेळाडूंमध्ये शाब्दिक युद्ध होणे आजकाल सामान्यच आहे. पण सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जे दिसतंय, ते खऱ्या क्रिकेटरसिकाला नक्कीच पसंत पडणार नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की मैदानावर खेळाडूंमधील वाद इतका विकोपाला जातो की प्रकरण थेट हाणामारीपर्यंत पोहोचते. चक्क पिचवर खेळाडू एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी तुडवताना दिसतात.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ MCC वीकडे बॅश XIX लीगचा आहे. ही क्रिकेट लीग UAE मध्ये खेळवली जाते. या लीगदरम्यान एरोविसा क्रिकेट आणि रबदान क्रिकेट क्लब यांच्यात सामना झाला. या सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंनी सर्व मर्यादा ओलांडल्या. सामन्यादरम्यान एरोविसा क्रिकेट संघाच्या गोलंदाजाने रबदान संघाच्या फलंदाजाला बाद केल्यानंतर जोरदार जल्लोष केला. पण गोलंदाजाने उत्साहाच्या भरात बाद फलंदाजाला अशा प्रकारे डिवचले की प्रकरण हाताबाहेर गेले. पाहा व्हिडीओ-

गोलंदाजाला असे सेलिब्रेशन करताना पाहून फलंदाजाचाही संयम सुटला. त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. दोन्ही खेळाडू क्रीजवरच एकमेकांवर हात उचलताना दिसले. यादरम्यान संघातील इतर काही खेळाडूही भांडणात सामील झाले तर काहींनी भांडण सोडवायचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

टॅग्स :ऑफ द फिल्डसामाजिकसोशल व्हायरलसोशल मीडिया