Join us

Shivam Mavi Cacth, IND vs SL 3rd T20: अफलातून! तुफान वेगाने आलेला कॅच शिवम मावीने सीमारेषेवर टिपला (Video)

शिवम मावीने गोलंदाजी, फलंदाजीसह फिल्डिंगमध्ये दाखवली चमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 00:04 IST

Open in App

Shivam Mavi Cacth, IND vs SL 3rd T20: टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने तिसऱ्या आणि अखेरच्या टी२० सामन्यात श्रीलंकेला ९१ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले आणि २-१ ने मालिका जिंकली. सूर्यकुमार यादवने केलेले शतक आणि भारतीय गोलंदाजांची शिस्तबद्ध गोलंदाजी यांच्या जोरावर टीम इंडियाने श्रीलंकेवर मालिका विजय मिळवला. आणि भारतात श्रीलंकेविरूद्ध मालिका जिंकण्याची परंपरा कायम ठेवली. भारताचा नवखा खेळाडू शिवम मावी पहिल्या सामन्यात गोलंदाजीत चमकला, दुसऱ्या सामन्यात त्याने फलंदाजीही चमक दाखवली तर आजच्या सामन्यात त्याने घेतलेल्या झेलाची चर्चा रंगली.

२२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरूवात खराब झाली. त्यानंतर त्यांना सावरता आले नाही. पाथुम निसांका १५ धावांवर बाद झाला. कुसल मेंडिस देखील २३ धावा काढून माघारी परतला. या दोघांच्या बाद होण्यानंतर श्रीलंकेच्या डावाला गळती लागली. अविष्का फर्नांडो १ धाव काढून बाद झाला. त्यानंतर धनंजय डिसिल्वा २२ धावांवर माघारी परतला. त्यानंतर युजवेंद्र चहलने चरिथ असालांकाला गोलंदाजी केली त्यावेळी १९ धावांवर असताना त्याने फटका मारला. चेंडू हवेत गेला, त्याच वेळी शिवम मावीने अप्रितम सीमारेषेवर अप्रतिम झेल टिपला.

त्याआधी, भारताचा इशान किशन पहिल्याच षटकात बाद झाला. पण त्यानंतर राहुल त्रिपाठीने १६ चेंडूत तुफानी ३५ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने दमदार खेळी केली. शुबमन गिलअर्धशतकाच्या जवळ पोहोचला पण ४४ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या (४) आणि दीपक हु़ड्डा (४) स्वस्तात बाद झाले. हे दोघे गेल्यावर अक्षर पटेलने सूर्यकुमारला चांगली साथ दिली. सूर्यकुमारने तुफान फटकेबाजी करत ४५ चेंडूत शतक ठोकले. हे सूर्याचे तिसरे आणि भारतीय फलंदाजाकडून यंदाच्या वर्षातील पहिले टी२० शतक ठरले. सू्र्याने ७ चौकार आणि ९ षटकारांच्या साथीने नाबाद ११२ धावा चोपल्या. अक्षर पटेलनेही ९ चेंडूत ४ चौकारांसह नाबाद २१ धावा करत संघाला २२८ धावांपर्यंत पोहोचवले.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकासूर्यकुमार अशोक यादवहार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघ
Open in App