Join us  

Video : शिखर धवन बनला धोबी... सायना नेहवालसह डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबीकडून सांत्वन

कोरोना व्हायरसमुळे मंगळवारी टोक्योत होणारी ऑलिम्पिक स्पर्धाही एका वर्षासाठी पुढे ढकलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 11:53 AM

Open in App

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यापूर्वी इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लीगा, सीरि ए इटालियन लीग आदी फुटबॉल स्पर्धांप्रमाणे भारत-दक्षिण आफ्रिका, श्रीलंका-इंग्लंड, पाकिस्तान- बांगलादेश, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड या क्रिकेट मालिकाही रद्द करण्यात आला. त्यामुळे खेळाडूंना आता घरीच रहावे लागत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परदेशातून प्रवास करून आलेल्या खेळाडूंना स्वतःला आयसोलेट केले आहे. अनेक खेळाडूंना आपल्या कुटुंबीयांना भरपूर वेळ द्यायला मिळत आहे. पण, टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन याच्यासाठी घरी राहणं टेंशनचं काम बनलं आहे. त्याच्या पत्नीनं त्याला चक्क कपडे धुवायला लावले आणि गब्बरनं तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. 

या व्हिडीओत धवनची पत्नी मेकअप करताना दिसत आहे आणि धवन बाथटबमध्ये बसून कपडे धुवत आहे. धवनने या व्हिडीओत बॉलिवूडचं गाणं जबसे हुई है शादी... हे वाजवलं आहे.  त्यात त्यानं लिहीलं की,''एक आठवडं घरी थांबल्यानंतर ही अवस्था...''पाहा व्हिडीओ

धवनच्या या व्हिडीओवर फुलराणी सायना नेहवाल हिच्यासह ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर, अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी आणि सनरायझर्स हैदराबादचा श्रीवत्स गोस्वामी यांनी सांत्वन केलं आहे. 

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे (सोशल डिस्टन्सिंग, सामाजिक दुरावा), घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असे कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात २१ दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

लिओनेल मेस्सी अन् ख्रिस्तियानो रोनाल्डो यांंचा मदतीचा हात; सार्वजनिक हॉस्पिटलला कोट्यवधींची मदत

सानिया मिर्झाची समाजोपयोगी चळवळ; रोजंदारी कामगारांचे पोट भरण्याचा निर्धार

संपूर्ण देश लॉकडाऊन; आर अश्विननं जनतेला करून दिली 'त्या' प्रसंगाची आठवण

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याशिखर धवनसायना नेहवालडेव्हिड वॉर्नर