Join us

सर्फराज खानसाठी Romana रडली, कारण संघर्षात ती त्याच्यासोबत उभी राहिली; कोण आहे ती?

Sarfaraz Khan wife Romana :  अनिल कुंबळे यांच्या हस्ते सर्फराज खानला पदार्पणाची कॅप दिली गेली आणि बाजूलाच उभे असलेले त्याचे वडील नौशाद यांना अश्रू अनावर झाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 09:56 IST

Open in App

Sarfaraz Khan wife Romana :  अनिल कुंबळे यांच्या हस्ते सर्फराज खानला पदार्पणाची कॅप दिली गेली आणि बाजूलाच उभे असलेले त्याचे वडील नौशाद यांना अश्रू अनावर झाले.. कॅप घेऊन सर्फराज वडिलांकडे धावला आणि त्यांनी त्या कॅपला किस केले अन् लेकाला कडकडून मिठी मारली... राजकोटमध्ये आज वातावरण एकदम इमोशनल झाले होतं.. हा क्षण पाहण्यासाठी सर्फराजची पत्नी रोमानाही तिथे उभी होती आणि तिच्याही डोळ्यांत अश्रू तरळले... सर्फराजने तिचे अश्रू पुसले आणि तिला कॅप दाखवली व मिठी मारली...

सर्फराज खानने ६ ऑगस्ट २०२३ मध्ये काश्मीरमधील रोमाना जहूरशी लग्न केले आहे .  काळ्या रंगाची शेरवानी परिधान केलेल्या वराच्या रुपात सर्फराज खान काश्मीरला पोहोचला होता आणि त्याची वधू लाल रंगाच्या लेहेंग्यात दिसली होती. सर्फराजची पत्नी रोमना जहूरने दिल्लीतून एमएससीचे शिक्षण घेतले होते. सर्फराजची बहीणही दिल्लीत रोमना ज्या कॉलेजमध्ये शिकली होती त्याच कॉलेजमध्ये शिकली होती. दोघांमध्ये चांगली मैत्री होती आणि बहिणीमुळेच सर्फराज खान आणि रोमना यांची पहिली भेट झाली होती.

पहिल्या नजरेत रोमनाच्या प्रेमात सर्फराज खान क्लीन बोल्ड झाला होता आणि त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. जेव्हा सर्फराज-रोमाना एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर लग्नाचे प्रकरण पुढे गेले. सर्फराजचे कुटुंबीय लग्नाचा प्रस्ताव घेऊन रोमनाच्या घरी पोहोचले होते. अशा परिस्थितीत दोघांनीही संपूर्ण कुटुंबाच्या संमतीने लग्न केले.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडमुंबईभारतीय क्रिकेट संघसर्फराज खान