Sanju Samson Father Crying: भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर संजू सॅसमनने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विंडीजविरूद्ध दमदार खेळी केली. संजूला आधीच्या सामन्यात सातत्याने संघाबाहेर बसवण्यात आले होते. पण अखेर त्याला संधी मिळाली आणि त्याने संधीचे सोनं करत नाबाद ९७ धावा कुटल्या. या सामन्यानंतर आपल्या लेकाबद्दल बोलताना संजूचे वडील सॅमसन विश्वनाथ भावनिक झाल्याचे दिसून आले.
संजूचा दमदार खेळ
एका मुलाखतीदरम्यान बोलताना संजूचे वडील सॅमसन विश्वनाथ यांना रडू कोसळले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचे स्पष्टपणे दिसून आले. याचे कारण काय.. समजून घ्या. संजू सॅमसनच्या वडिलांना अश्रू का आले? यामागील कारण संजू सॅमसनशी संबंधित आहे. मुलाखतीदरम्यान रडणाऱ्या संजू सॅमसनच्या वडिलांचा व्हिडिओ इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलच्या आधीचा आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सुपर-८ सामन्यानंतरचा आहे. त्या सामन्यात भारताच्या विजयात संजू सॅमसनच्या नाबाद ९७ धावांच्या खेळीने मोठी भूमिका बजावली होती.
संजूचे वडील का रडले?
संजू सॅमसनच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या खेळीनंतर, त्याचे वडिल एका मुलाखतीत खूप रडताना दिसले. त्यांच्या मुलाच्या यशामुळे ते भावनिक झाले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याच्या दिवशी ते पहिल्या चेंडूपासून सामना पाहण्यासाठी बसले आणि शेवटच्या चेंडूपर्यंत उठले नाहीत. ते कोणाचाही फोन उचलत नव्हते आणि फक्त त्यांच्या मुलाचा खेळ पाहत होते. त्यांनी पहिल्यांदाच देवाकडे काहीतरी मागितले होते. ते म्हणाले की त्यांनी फक्त देवाकडे संजूची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी त्याला एक संधी मिळावी असे साकडे घातले होते. त्या दिवशी त्यांची मागणी मान्य झाली. त्यामुळे सॅमसन विश्वनाथ यांना अश्रू अनावर झाले आणि व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली.
Web Summary : Sanju Samson's father, Viswanath, emotionally broke down after his son's unbeaten 97 against the West Indies. He revealed he prayed for Sanju to get a chance to prove himself, which led to tears of joy when his son succeeded.
Web Summary : वेस्टइंडीज के खिलाफ संजू सैमसन की नाबाद 97 रनों की पारी के बाद उनके पिता विश्वनाथ भावुक हो गए। उन्होंने बताया कि उन्होंने संजू को खुद को साबित करने का मौका मिलने के लिए प्रार्थना की थी, जिसके बाद बेटे की सफलता पर खुशी के आंसू छलक पड़े।