Video: रोहितची 'नन्ही परी' शिकतेय स्पॅनिश; वय फक्त तीन महिने

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आपल्या संघाला टॉप फोरमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 15:53 IST2019-04-10T15:53:05+5:302019-04-10T15:53:25+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Video: Rohit sharma's baby Learning Spanish lessons at 3 months | Video: रोहितची 'नन्ही परी' शिकतेय स्पॅनिश; वय फक्त तीन महिने

Video: रोहितची 'नन्ही परी' शिकतेय स्पॅनिश; वय फक्त तीन महिने

मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आपल्या संघाला टॉप फोरमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्स पाच सामन्यांत तीन विजयांसह पाचव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सला बुधवारी वानखेडे स्टेडियमवर किंग्स इलेव्हन पंजाबचे आव्हान पेलावे लागणार आहे. पंजाबचा संघ चार विजयांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे रोहितच्या संघाला त्यांना नमवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. या सामन्यात रोहितचे मनोबल उंचावण्यासाठी त्याची मुलगी समायराही नक्की येणार आहे. आयपीएलच्या काही सामन्यात समायरा आई रितिका सजदेहसोबत स्टेडियममध्ये दिसली होती. पण, या सामन्यापूर्वी समायराही अभ्यासात गुंग झाली आहे. तीन महिन्याची समायरा चक्क स्पॅनिश शिकत आहे. रोहितने तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 




भारतीय संघातील हिटमॅन रोहित शर्मा आणि रितिका सजदेह या दाम्पत्याला डिसेंबर महिन्यात कन्यारत्न प्राप्ती झाली. त्यांनी तिचं नाव समायरा असं ठेवलं. काही दिवसांपूर्वी या शर्मा दाम्पत्याची मान अभिमानानं उचावली आणि त्याला कारण त्यांची तीन महिन्यांची समायरा ठरली आहे. ओल पेजेटा या वन्यजीव संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या संस्थेनं समायराचा गौरव केला आहे. केनियातील वन्यजीव संरक्षित क्षेत्रात जन्मलेल्या मादी गेंड्याला समायराचे नाव देण्यात आले आहे. दोन महिनेच्या कन्येचा झालेला हा गौरव पाहून बापमाणूस रोहितचे डोळे पाणावले आणि त्याने ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यात भर म्हणून समायरा चक्क स्पॅनिश भाषा समजण्याचा प्रयत्न करत आहे. आयपीएलच्या व्यग्र वेळापत्रकातही रोहित मुलीला अधिकाधिक वेळ देत आहे.


पाहा व्हिडीओ...


 

MI च्या सराव सत्रात रोहित शर्माला दुखापत, वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ तणावात
मुंबई इंडियन्सचा संघ विजयाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी बुधवारी घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणार आहे. मुंबई इंडियन्सने मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर जोरदार सराव केला. पण, या सरावात कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर असताना रोहितला झालेली दुखापत भारतीय संघाची चिंता वाढवणारी आहे. सराव सत्रात रोहितला दुखापत झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Web Title: Video: Rohit sharma's baby Learning Spanish lessons at 3 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.