Rohit Sharma’s Video Goes Viral: टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. १९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा मैदानात उतरणार आहेत. यासाठी रोहितने मुंबईतील शिवाजी पार्क येथे सराव सुरू केला आहे. यावेळी आपल्या लाडक्या रोहितला पाहण्यासाठी चाहते मैदानावर गर्दी करत आहेत. यादरम्यान, रोहितच्या एका कृतीने सर्वांचीच मने जिंकली आहेत.
सरावादरम्यान काय झाले?
सरावादरम्यान एक छोटा चाहता रोहित शर्माला भेटण्यासाठी थेट मैदानात धावून आला. यावेळी सुरक्षा रक्षकाने त्या मुलाला थांबवण्याचा प्रयत्न केला. हे पाहून रोहित भडकले आणि त्यांनी रागाने त्या गार्डला बाजुला होण्यास सांगितेल. यानंतर रोहितने त्या छोट्या चाहत्याला जवळ बोलावले. हा प्रसंग पाहून मैदानावर उपस्थित लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि रोहितच्या मोठ्या मनाचे कौतुक केले.
आणखी एक व्हिडिओ व्हायरल...
रोहित शर्माचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एक लहान मुलगा मुंबई इंडियन्सच्या जर्सीत रोहितकडे आल्याचे दिसतो. रोहितने त्याच्या जर्सीवर स्वाक्षरी (ऑटोग्राफ) केल्यानंतर मुलगा भावूक होऊ रडू लागतो. हे दृष्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रोहित-विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होते. आता ते पुन्हा एकदा शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियामध्ये दिसणार आहेत. शिवाजी पार्कमधील सरावादरम्यान रोहितसोबत माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर आणि युवा फलंदाज अंकृष रघुवंशी उपस्थित होते. रोहित आपल्या फलंदाजीच्या लयीत परतण्यासाठी जोरदार सराव करत आहेत.