Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत

ती पहिल्यांदाच हार्दिक पांड्याला चीअर करण्यासाठी मैदानात आली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 22:41 IST

Open in App

 Hardik Pandya Flying Kiss For Girlfriend Mahika Sharma Viral Vidoe : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नरेंद्र मोदी स्टेडिमवर हार्दिक पांड्याने तुफान फटकेबाजीसह हवा केली. या सामन्यात पहिल्यांदाच हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिका त्याला चीअर करण्यासाठी आली होती. मॅच आधी या गोष्टीची चर्चाही रंगली. ती आली अन् हार्दिक पांड्याची  बॅट तळपली.  त्यानंतर आता हार्दिक पांड्यानं भर मैदानातून गर्लफ्रेंडवर केलेली प्रेमाची बरसात चर्चेचा विषय ठरत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

मॅच दरम्यान हार्दिक-माहिका यांच्यात रंगला प्रेमाचा खेळ

दक्षिण आफ्रिकेच्या संघातील गोलंदाजांची धुलाई करताना हार्दिक पांड्याने १६ चेंडूत अर्धशतक झळकावले. भारताकडून दुसरी जलदी अर्धशतकी खेळी केल्यावर पांड्याने हे अर्धशतक आपल्या गर्लफ्रेंडसोबत सेलिब्रेट केले. भर मैदानातून त्याने स्टँडमध्ये बसलेल्या माहिका शर्माकडे पाहून तिला फ्लाइंग किस दिला. त्यावर तिनेही त्याला इशाऱ्यातूनत आपल्या मनातील भावना पोहचवली. मॅच दरम्यान हार्दिक पांड्या अन् माहिका यांच्यात रंगलेला प्रेमाचा खेळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी

पांड्यानं शेअर केली होती माहिका लकी असल्याची गोष्ट

मागील काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा ही जोडी चर्चेचा विषय ठरत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियात कमबॅक करताना हार्दिक पांड्याने अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर त्याने दुखापतीतून सावरताना जवळच्या लोकसोबत होते, असा उल्लेख करताना थेट माहिकाचे नाव घेतले होते. ती आयुष्यात आल्यापासून सर्वकाठी ठिक होत आहे, असे तो म्हणाला होता. आता मालिकेचा शेवट अर्धशतकासह करताना त्याने गर्लफ्रेंडवर पुन्हा एकदा खुलेआम प्रेमाची बरसात केल्याचे पाहायला मिळाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Hardik Pandya's flying kiss for girlfriend Mahika Sharma goes viral.

Web Summary : Hardik Pandya celebrated his half-century against South Africa by blowing a kiss to his girlfriend, Mahika Sharma, in the stands. Mahika's presence at the match was widely discussed, and their affectionate exchange quickly went viral on social media. Pandya has credited Mahika for his improved performance.
टॅग्स :हार्दिक पांड्यादक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघव्हायरल व्हिडिओ