Join us

VIDEO : शाहिद आफ्रिदी भारतीय चाहत्याला म्हणाला, 'या म्हशींची टीम बनव आणि IPL मध्ये विकून टाक'

एका लाइव्ह सेशनदरम्यान, काही भारतीय चाहतेही शाहिद आफ्रिदीसोबत लाइव्ह चॅटमध्ये सहभागी झाले. यादरम्यान एक गुजराती म्हशीवालाही आफ्रिदीसोबत लाइव्ह चॅटमध्ये जोडला गेला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 18:08 IST

Open in App

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने इंस्टाग्राम लाइव्हवर चाहत्यांशी संवाद साधला. या लाइव्ह सेशनदरम्यान, काही भारतीय चाहतेही शाहिद आफ्रिदीसोबत लाइव्ह चॅटमध्ये सहभागी झाले. यादरम्यान एक गुजराती म्हशीवालाही आफ्रिदीसोबत लाइव्ह चॅटमध्ये जोडला गेला. त्याचा साधेपणा पाहून आफ्रिदीही त्याच्या प्रेमात पडला.

शाहिद आफ्रिदी या गुजराती मुलाशी अतिशय नम्रपणे बोलताना दिसत आहे. एवढेच नाही, तर मुलाच्या बोलण्यावर आफ्रिदी एवढा खूश झाला, की त्या मुलाचे संपूर्ण बोलणे ऐकूण आफ्रिदी म्हणाला, 'भावा, तुझ्यासारख्या मनाने शुद्ध असलेल्या मुलांवर मी खूप प्रेम करतो.' याचवेळी, या संवादादरम्यान आफ्रिदीने गमतीने आयपीएलचाही उल्लेख केला.

शाहिद आफ्रिदी त्या म्हशी चारणाऱ्या मुलाला गायी-म्हशी दाखवायला सांगतो. आफ्रिदीच्या सांगण्यावरून तो मुलगा त्याला त्याच्या म्हशी दाखवलतो. ते पाहून आफ्रिदी म्हणतो, 'तू म्हशींची चांगली टीम तयार केली आहे. या संर्वांना आयपीएलची टीम बनवून विकून टाक. त्यांना सांगं, की मी आयपीएल टीम तयार केली आहे.

शाहिद आफ्रिदी हा पाकिस्तानच्या सर्वात यशस्वी क्रिकेटर्सपैकी एक आहे. त्याने पाकिस्तानसाठी 27 टेस्ट, 398 वनडे आणि  99 टी-20 सामने खेळले आहेत. शाहिद आफ्रिदीच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये 395 विकेट आहेत. तर, टी-20 मध्येही त्याने 98 विकेट्स मिळवल्या आहेत.

हेही वाचा-

VIDEO : शाहिद आफ्रिदी बिहारी मुलाला म्हणाला, तुमचा भारत बाहेर, आता...? मिळालं उत्तर

 

टॅग्स :शाहिद अफ्रिदीपाकिस्तानआयपीएल २०२१भारतइन्स्टाग्राम
Open in App