Video: रोहित शर्मा हॉटेल रूममध्ये पासपोर्टच विसरला; बस थांबवली, इतर खेळाडूंनी घेतली मजा

रोहितचा हा धम्माल व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 11:14 AM2023-09-18T11:14:42+5:302023-09-18T11:20:49+5:30

whatsapp join usJoin us
Video of Rohit Sharma forgot passport in hotel room Teammates poke fun at him watch Asia Cup IND vs SL | Video: रोहित शर्मा हॉटेल रूममध्ये पासपोर्टच विसरला; बस थांबवली, इतर खेळाडूंनी घेतली मजा

Video: रोहित शर्मा हॉटेल रूममध्ये पासपोर्टच विसरला; बस थांबवली, इतर खेळाडूंनी घेतली मजा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma Passport Viral Video : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स या यूट्युब शो मध्ये काही वर्षांपूर्वी सांगितले होते की टीम इंडियातील सर्वात विसराळू खेळाडू म्हणजे रोहित शर्मा. 'मी रोहित शर्माएवढा विसरभोळा माणूस कधीच पाहिलेला नाही. तो स्वत:चा आयपॅड, पासपोर्ट आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी एअरपोर्टवर किंवा इतर कुठेही विसरतो,' असं विराट कोहलीने सांगितलं होतं. ही गोष्ट अगदी तंतोतंत बरोबर असल्याचा प्रत्यय आशिया कप जिंकल्यानंतर साऱ्यांना आला.

भारताने आशिया कपची फायनल जिंकली. सिराजच्या ६ विकेट्सच्या जोरावर भारताने श्रीलंकेला ५० धावांत गुंडाळले. त्यानंतर शुबमन गिल आणि इशान किशन या जोडीने भारताला ६.१ षटकांत दमदार विजय मिळवला. या विजयानंतर रविवारी रात्रीच संघ भारतात परतला. या दरम्यान रोहित शर्मा आणि मंडळी भारतात यायला निघत असताना मजेशीर घटना घडली. रोहित शर्मा त्याचा पासपोर्ट हॉटेल रूममध्येच विसरला. त्यामुळे काही वेळासाठी टीम बस थांबवून ठेवावी लागली. हॉटेल स्टाफने नंतर रोहितला पासपोर्ट आणून दिला आणि मग संघ पुढे रवाना झाला. पाहा व्हिडीओ-

दरम्यान, व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसून आले की पासपोर्ट विसरल्यानंतर जेव्हा रोहितला काही वेळ वाट पाहावी लागली तेव्हा तो काहीसा ओशाळला होता. त्याच वेळी इतर खेळाडू मात्र त्याची मज्जा घेत होते. व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह हे दोघे गालातल्या गाल्यात हसतानाही दिसत होते.

Web Title: Video of Rohit Sharma forgot passport in hotel room Teammates poke fun at him watch Asia Cup IND vs SL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.