Join us

Video: धोनीच्या ऑटोग्राफने 3 लाखांची बाईक 3 कोटींची झाली? व्हिडिओ व्हायरल...

MS Dhoni: एमएस धोनी आपल्या एका चाहत्याच्या नवीन बाइकवर ऑटोग्राफ करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 15:47 IST

Open in App

MS Dhoni: महेंद्रसिंह धोनी फक्त क्रिकेटमधील कामगिरीसाठीच नाही, तर आपल्या कूल स्वभाव आणि चाहत्यांप्रती असलेल्या आपुलकीसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय, धोनीचे बाइकप्रेम सर्वश्रृत आहे. अलीकडेच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात धोनी एका चाहत्याच्या Royal Enfield Interceptor 650 या बाइकवर ऑटोग्राफ देताना दिसतो. पण, त्यानंतर ते होते, त्याची कल्पनाही कोणी केली नसेल. 

धोनीचा ऑटोग्राफ अन् वाढली बाइकची किंमत?

ही घटना रांचीतील धोनीच्या फार्महाऊसजवळ घडली. व्हिडिओमध्ये एक चाहता आपली लाल रंगाची रॉयल एनफिल्ड घेऊन धोनीला भेटायला आला होता. धोनीने बाइक पाहून तिची स्तुती केली आणि पेट्रोल टँकवर आपला ऑटोग्राफदेखील दिला. यामुळे त्या चाहत्याचा आनंद गगनात मावत नव्हता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून, तो आतापर्यंत 51 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. चाहत्यांनी धोनीच्या या कृतीवर कौतुक करत लिहिले, “किती नशीबवान आहे तो चाहता, ज्याला माहीचा ऑटोग्राफ मिळाला.” तर, व्हिडिओ पाहून एका युजरने मजेशीर कमेंट केली की, “3 लाखांची बाइक आता 3 कोटींची झाली!” 

धोनीचे बाइकप्रेम

धोनीचे बाइक्सप्रेम सर्वपरिचित आहे. रांचीतील त्याच्या फार्महाऊसमध्ये एक मोठे गॅरेज आहे, ज्यात व्हिंटेजपासून ते आजच्या सुपरबाईकपर्यंत शेकडो बाईक्स आहेत. त्याच्या कलेक्शनमध्ये कावासाकी निन्जा एच2, कॉन्फेडरेट एक्स132 हेलकॅट, कावासाकी निन्जा झेडएक्स-14आर, हार्ले डेव्हिडसन फॅटबॉय, डुकाटी 1098, यामाहा आरडी350, यामाहा राजदूत, सुझुकी शोगुन, बीएसए गोल्डस्टार आणि नॉर्टन ज्युबिली 250 यासारख्या अनेक बाइक्स आहेत. 

माही IPL मध्ये परतणार

धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्याने अद्याप निवृत्त जाहीर केलेली नाही. त्यामुळे तो आगामी IPL 2026 मध्ये खेळताना दिसेल, अशी माहिती चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चे सीईओ कासी विश्वनाथन यांनी दिली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Dhoni's autograph turns ₹3 lakh bike into ₹3 crore? Viral video.

Web Summary : MS Dhoni autographed a fan's Royal Enfield, sparking viral buzz. The bike's value purportedly skyrocketed from ₹3 lakh to ₹3 crore, delighting fans. Dhoni's known for his bike collection and is expected to play in IPL 2026.
टॅग्स :महेंद्रसिंग धोनीसोशल मीडियाचेन्नई सुपर किंग्सरॉयल एनफिल्डबाईक