Irani Cup Yash Dhull And Yash Thakur Fight Video : रणजी चॅम्पियन विदर्भ संघाने देशांतर्गत क्रिकेटमधील आपला दबदबा कायम राखत इराणी चषक स्पर्धा जिंकली आहे. नागपूरच्या घरच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात विदर्भ संघाने रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील शेष भारत (Rest of India) संघाला ९३ धावांनी पराभूत करत तिसऱ्यांदा इराणी ट्रॉवर नाव कोरले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दुसऱ्या डावात यश धुलनं विदर्भ संघाच्या गोलंदाजांना दमवलं; पण..
अथर्व तायडे याने पहिल्या डावात केलेल्या १४३ धावा आणि यश राठोडच्या भात्यातून आलेल्या १५३ चेंडूतील ९१ धावांच्या खेळीच्या जोरावर विदर्भ संघाने पहिल्या डावात ३४२ धावा केल्या होत्या. याला प्रत्युतर देताना शेष भारत संघ कमी पडला. अभिमन्यू ईश्वरन ५२ (११२) आणि रजत पाटीदार ६६ (१२५) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर शेष भारत संघाने पहिल्या डावात २४२ धावांपर्यंतच मजल मारली. दुसऱ्या डावात २३२ धावा करत विदर्भ संघाने शेष भारत संघासमोर ३६१ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना शेष भारत संघाचा डाव २६७ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात यश धुलनं विदर्भ संघाच्या गोलंदाजांना दमवलं. पण त्याची विकेट पडताच विदर्भ संघाच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. या विकेटनंतर बॅटर अन् बॉलर यांच्यात चांगलेच वाजलं.
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
दोन यश एकमेकांना भिडले! नेमकं काय घडलं?
विदर्भ संघाच्या विजयात यश धुल हा एक मोठा अडथळा बनून उभा राहिला होता. शेवटी यश ठाकूरनं त्याची विकेट घेतली. त्याने ९२ धावांची खेळी केली. विदर्भ संघातील खेळाडू या विकेटचा जल्लोष करत असताना दुसऱ्या बाजूला यश धुल आणि यश राठोड एकमेकांना भिडले. पंचांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. मैदानातील हा प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.