भारतीयांचे विजयी पुनरागमन; दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडला ८ धावांनी नमवलं

दीप्ती शर्मा ठरली भारताच्या विजयाची शिल्पकार. भारतानं केल्या होता २० षटकांत १४८ धावा.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 12:00 PM2021-07-12T12:00:40+5:302021-07-12T12:01:34+5:30

whatsapp join usJoin us
The victorious return of the Indian woman cricket team In the second T20 match England lost by 8 runs | भारतीयांचे विजयी पुनरागमन; दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडला ८ धावांनी नमवलं

भारतीयांचे विजयी पुनरागमन; दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडला ८ धावांनी नमवलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देदीप्ती शर्मा ठरली भारताच्या विजयाची शिल्पकार.भारतानं केल्या होता २० षटकांत १४८ धावा.

होव : रविवारी झालेल्या दुसर्या टी-२० सामन्यात भारतीय संघानं पुनरागमन करत इंग्लंडला ८ धावांनी नमवलं. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर भारतीयांनी ४ बाद १४८ धावा केल्या. त्यांनंतर इंग्लंडला ८ बाद १४० धावांमध्ये रोखत भारतानं बाजी मारली. 

फीरकीपटू दीप्ती शर्मा भारताच्या विजयाची शिल्पकार ठकली. तिनं फलंदाजीत महत्त्वपूर्ण खेळी केल्यानंतर टॅमी ब्लूमोंटचा मोलाचा बळी मिळवला. त्याचप्रमाणे दीप्तीनं दोन धावबाद करण्यात योगदानही दिलं. सलामीवीर ब्यूमोंटने ५० चेंडूंत ५९ धावा केल्या. १४ व्या षटकांत दीप्तीनं ब्यूमोंटला पायचित केलं. त्यापूर्वी शेफाली वर्मानं (४८), कर्णधार हरनप्रीत कौरनं (३१) आणि दीप्ती (२४*) यांच्या जोरावर भारतानं समाधानकारक मजल मारली. 

संक्षिप्त धावफलक
भारत :
२० षटकांत ४ बाद १४८. (शेफाली वर्मा ४८, हरमनप्रीत कौर ३१ दीप्ती शर्मा नाबाद २४; मॅडी व्हिलर्स १/९, सराह ग्लेन १/३१)

इंग्लंड : २० षटकांत ८ बाद १४० धावा. (टॅमी ब्यूमोंट ५९, हीथर नाइट ३०; पूनम यादव २/१७, दीप्ती शर्मा १/१८, अरुंधती रेड्डी १/३०)

Web Title: The victorious return of the Indian woman cricket team In the second T20 match England lost by 8 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.