Vaishnavi Sharma Virat Kohli: भारतीय महिला संघात सध्या एका युवा खेळाडूची खूप चर्चा रंगली आहे. ही २० वर्षीय खेळाडू म्हणजे वैष्णवी शर्मा. वैष्णवी शर्मा हिला नुकत्याच झालेल्या WPLच्या लिलावात कुणीही विकत ङेतले नाही, पण तिला थेट आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या हस्ते तिला डेब्यू कॅप मिळाली. निरागस हास्य आणि सौंदर्य यामुळे अल्पावधीतच वैष्णवी भारतीय चाहत्यांच्या पसंतीस उतरली. क्रिकेट चाहत्यांची लाडकी झालेल्या वैष्णवीने नुकतेच विराट कोहलीबाबत मोठे विधान केले आहे.
विराट कोहलीची तोंडभरून स्तुती
वैष्णवी शर्माने नुकतीच एक मुलाखत दिली. मिळालेल्या माहितीनुसार, सुनो इंडियाला दिलेल्या मुलाखतीत वैष्णवी शर्मा म्हणाली, "विराट कोहली हा जगातील सर्वात हँडसम क्रिकेटपटू आहे. त्याचे लूक्स मला खूप आवडतात. तो खूपच छान दिसतो. विराट कोहलीचा चार्म हा इतर सर्व क्रिकेटर्सपेक्षा खूपच जास्त आहे. विराट कोहली हा सर्वच क्षेत्रात सर्वोत्तम आहे. फलंदाजी, फिल्डिंग, फिटनेस, क्रिकेटचे विक्रम, एक चांगला माणूस, हँडसम लूक, बोलका चेहरा. विराट कोहलीकडे सारं काही आहे. म्हणूनच मला वाटतं की विराट कोहली हा सर्वांमध्ये सर्वोत्तम आहे."
वर्ल्डकपमध्ये घेतली हॅटट्रिक
वैष्णवी मध्य प्रदेशातील ग्वालियर येथील रहिवासी आहे. तिचे वडील नरेंद्र शर्मा हे व्यवसायाने ज्योतिष आहेत. वैष्णवी शर्मा ही यंदाच्या अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील खेळाडू होती. या स्पर्धेत तिने सर्वाधिक १७ विकेट्स घेत लक्ष वेधले होते. या कामगिरीनंतर तिने देशांतर्गत क्रिकेटमधील सीनियर महिला टी२० ट्रॉफी स्पर्धेत २१ विकेट्स घेतल्या. या दोन स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर तिला भारतीय संघात संधी मिळाली. वैष्णवीने १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषक २०२५ स्पर्धेत हॅटट्रिक घेतली होती. मलेशियाविरुद्ध ही कामगिरी करत ती हॅटट्रिक घेणारी भारताची सर्वात युवा गोलंदाजही ठरली होती.